लिव्ह-इन-रिलेशनमधून मित्राने मित्रालाच संपवले, दारुच्या नशेत हत्या की बेवफाईचा संशय ?
या घटनेनंतर शहरात घबराट पसरली आहे. पोलिस प्रत्येक अंगाने या घटनेचा तपास करत आहेत. ही हत्या केवळ दारुच्या नशेत झाली की या मागे आणखी काही कारण आहे याचा तपास सुरु आहे.

महाराष्ट्राच्या अकोला शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अकोला शहरातील सनसनाटी हत्याकांड घडले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मित्रांनी दारुच्या नशेत इतके भांडण झाले की एकमेकांच्या जीवावर उठले. या दोघांमध्ये अनैसर्गिक संबंध असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतू पोलिसांनी लागलीच असा निष्कर्ष काढता येणार नाही असे सांगत अजून तपास सुरु असल्याचे म्हटले आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकोला शहरातील मोठी उमरी या भागात घडली आहे. मृताचे नाव अमोल दिगंबर पवार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच जवळचा मित्र नितेश अरुण जंजाळ याला सिव्हील लाईन पोलिसांनी हत्ये प्रकरणात अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल आणि नितेश गेल्या तीन वर्षांपासून मोठी उमरीच्या संजय नगरात एकत्र राहत होते. स्थानिक लोकांनी दावा केला आहे की दोघांच्यामध्ये संबंध होते. मात्र, पोलिसांनी म्हटले आहे की नात्यांसंदर्भात जी बाबसमोर आली आहे. ती केवळ स्थानिक सूत्रांवर आधारित आहे. तपासात समोर आले आहे की दोघे दोस्त होते आणि त्यांच्या दरम्यान दारुवरुन वाद होत होते. गुरुवारी देखील त्यांच्या दारु पिण्यावरुन वाद झाला होता. त्यातून शब्दाला शब्द वाढत गेला आणि दोघात मारामारी झाली. त्यात नितेश याच्या हल्ल्यात अमोल पवार याचा मृत्यू झाला.
घटनेच्या दिवशी रात्री नितेश अमोल हा बाहेरुन जेवण घेऊन आला होता. या दरम्यान वाद वाढत गेला. रागात येऊन नितेश याने बांबूने अमोल यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक वार केला. ज्यामुळे जागेवरच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी नितेश घरातून बाहेर पडून ओरडायला लागला की अमोल निपचित पडला असून त्याचा मृत्यू झाला. त्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांनी कळवले. सिव्हील लाईन पोलिस जागेवर पोहचली आणि त्यांनी तपास सुरु केला.
पोलीसांचा तपास सुरु
पोलिसांनी सांगितले की अमोल याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खूणा आहेत. चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. अमोल याच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमधून बाहेर येईल असे म्हटले जात आहे. त्यांच्यातील नात्यासंदर्भातही चर्चा सुरु आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे सध्या कोणतीही माहिती नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे म्हटले जात आहे.
