AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ आय लव्ह यू, आय मिस यू अर्चना…’ पत्नीच्या अफेअरमुळे दु:खी सेक्युरिटी गार्डची ट्रेनसमोर उडी

देवरियामध्ये सुरक्षा रक्षक राकेश तिवारीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या खिशात रक्ताने माखलेली सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये त्याच्या पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याने आपल्या पत्नीला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवलं. पोलिस याप्रकरणाचा तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

' आय लव्ह यू, आय मिस यू अर्चना...' पत्नीच्या अफेअरमुळे दु:खी सेक्युरिटी गार्डची ट्रेनसमोर उडी
| Updated on: Jul 21, 2025 | 11:07 AM
Share

उत्तर प्रदेशच्या देवारियामध्ये एका खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृताचे डोके धडापासून 300 मीटर अंतरावर आढळले. या दुर्दैवी घटनेनंतर जीआरपीची टीम घटनास्थळी पोहोची असता, त्यांना तेथे मृताच्या खिशातून डीएम देवरिया यांना उद्देशून लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली, ज्यावर रक्ताचे डाग होते. त्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीचे चार वर्षांपासून दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या अफेअरबद्दल लिहिले आहे. ” I LOVE U I MISS U… माझ्या प्रेमात अशी काय कमतरात होती की तू मला हे पाऊल उचलण्यासभाग पाडलसं ?” असा सवाल त्याने पत्नीला उद्देशून विचारला. मृताने महिला पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांवर असा आरोपही केला की त्याने त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल तक्रार केली होती पण पोलिसांनी त्याचे ऐकले नाही आणि उलट त्याच्याकडून पैसे मागितले.

या प्रकरणात, देवरिया सदर रेल्वे स्टेशनच्या सरकारी रेल्वे पोलिस स्टेशनचे प्रभारी दिनेश कुमार पांडे यांनी सांगितले की, आत्महत्येचा एक प्रकार समोर आला आहे. एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृताची पत्नी त्याची ओळख पटवण्यासाठी आली आणि परत गेली. जर कोणतीही तक्रार आली तर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केलं.

देवरिया जिल्ह्यातील लार पोलीस स्टेशन हद्दीतील नादौली गावातील रहिवासी दिवंगत माधवेंद्र नाथ तिवारी यांचा मुलगा राकेश तिवारी यांचा विवाह 14 फेब्रुवारी 2009 रोजी बरहज पोलीस स्टेशन हद्दीतील कापरवार गावातील रहिवासी दिवंगत शेष मणी मिश्रा यांची मुलगी अर्चना मिश्रा यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सगळं काही आलबेल होतं. राकेशला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. तो VFS नावाच्या कंपनीतच सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता.

मात्र, रविवारी, देवरिया येथील सदर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह अत्यंत कुजलेला होता. त्याचं डोकं 300 मीटर अंतरावर पडलेले आढळले. त्याच्या खिशात एक सुसाईड नोट देखील सापडली ज्यामध्ये त्याने देवरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र लिहिल होतं, ज्यामध्ये त्याने आपल्या पत्नीला आत्महत्येसाठी जबाबदार धरल्याचं समोर आलं. त्याची पत्नी अर्चना मिश्रा हिचे तिच्या माहेरी असलेल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. ती त्याच्यासोबत राहते, असं त्यात लिहीलं होतं.

याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर, त्याच्या पत्नीला समजावून सांगूनही, ती अजूनही त्या तरुणासोबत तिच्या माहेरी राहते. चारही मुले त्याच्यासोबत राहतात, असं त्याने लिहीलं होतं. आपल्या पत्नीच्या या कृत्यामुळे मला आत्महत्या करणं भाग पडलं आहे, असंही त्याने नमूद केलं. माझ्या मृत्यूनंतर, प्रशासन पार्थिवाचे काहीही करू शकते असंही त्याने लिहीलं. एवढंच नव्हे तर त्या नोटमध्ये त्याने कित्येक वेळा आय लव्ह यू, आय मिस यू अर्चना, दिल दिया था जान भी दे गए ए सनम..असंही त्याने लिहीलं होतं.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.