AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Girl Assault : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण, ठाणे विशेष कोर्टाकडून आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

5 डिसेंबर 2015 रोजी, आरोपीने घराजवळ खेळत असलेल्या मुलीचे अपहरण केले आणि तिला जवळच्या जंगलात नेले. जिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीला दुखापत केली, असे तिने सांगितले.

Thane Girl Assault : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण, ठाणे विशेष कोर्टाकडून आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास
राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे.Image Credit source: TV9 Marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 12, 2022 | 5:32 PM
Share

ठाणे : सात वर्षांच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी ठाणे येथील विशेष न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी (Rigorous Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी सोमवारी आरोपी सज्जाद अस्लम कंकाली (26) याला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवले. न्यायाधीशांनी आरोपीला 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

डिसेंबर 2015 मध्ये घडली होती अपहरण आणि बलात्काराची घटना

विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी एकाच वसाहतीत राहतात. 5 डिसेंबर 2015 रोजी, आरोपीने घराजवळ खेळत असलेल्या मुलीचे अपहरण केले आणि तिला जवळच्या जंगलात नेले. जिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या चेहऱ्यावर आणि पाठीला दुखापत केली, असे तिने सांगितले. यानंतर त्याने मुलीला सोडून दिले. मुलगी रडत रडत घरी आली. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र वेदना होत होत्या. तिने घडला प्रकार तिच्या आईला सांगितला. खटल्यादरम्यान फिर्यादी पक्षाने पीडितेच्या पालकांसह 11 साक्षीदार तपासले.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्याचा निकाल सोमवारी सुनावण्यात आला. यात आरोपी सज्जाद अस्लम कंकाली याला दोषी ठरवत त्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 13 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (Sexual assault case on a minor girl, accused sentenced to 10 years rigorous imprisonment)

Follow Us
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी