AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांदूळ व्यापाऱ्यावर कार्यालयात गोळीबार, छातीत गोळी लागून रमेश अग्रवाल गंभीर जखमी

शहापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या राईस मिलमधील ऑफिसमध्ये घुसून तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला (Shahapur Trader Ramesh Agrawal attack)

तांदूळ व्यापाऱ्यावर कार्यालयात गोळीबार, छातीत गोळी लागून रमेश अग्रवाल गंभीर जखमी
व्यापारी रमेश अग्रवाल
| Updated on: Apr 28, 2021 | 10:23 AM
Share

शहापूर : शहापूरातील प्रसिद्ध तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. छातीत गोळी लागल्याने अग्रवाल गंभीर जखमी झाले आहेत. चेहऱ्याला काळे मास्क लावून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री हल्ला केला होता. (Shahapur Trader Ramesh Agrawal attack)

शहापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या राईस मिलमधील ऑफिसमध्ये घुसून तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर एक गोळी झाडली. ती छातीमध्ये उजव्या बाजूला आरपार घुसल्याने अग्रवाल हे गंभीर जखमी झाले आहेत.

अग्रवाल यांच्या छातीवर गोळीबार

मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी बाईकवर बसून तोंडाला काळे मास लावून दोन हल्लेखोर आले होते. दोन्ही हल्लेखोरांच्या हातात एक-एक रिव्हॉल्वर होती. अग्रवाल यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या मुलाने चोर-चोर अशी आरडाओरड करताच हल्लेखोर बाहेर निघाले. निघतांना पुन्हा त्यांनी हवेत दुसरी गोळी फायर केली.

ज्या दुचाकीवर बसून हल्लोखोर आले होते, ती तिथेच टाकून कुमार गार्डन हॉलच्या दिशेने त्यांनी पळ काढला. त्यानंतर मुंबई – नाशिक महामार्गाच्या दिशेने पळून जाण्यास ते यशस्वी झाले. हा सर्व प्रकार बाहेर बसलेल्या त्यांच्या वॉचमने बघितला आणि तोही भयभीत झाला.

अग्रवाल यांची प्रकृती चिंताजनक

रमेश अग्रवाल यांना लगेच शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीमधील गोळी बाहेर काढण्यात आली. परंतु जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अग्रवाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

कार्यालयात सीसीटीव्ही नसल्याने अडचणी

दिवसाला लाखो तर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या रमेश अग्रवाल या तांदूळ विक्रेत्याच्या राईस मिलमधील ऑफिसमध्ये CCTV कॅमरेही बसवलेले नाहीत. त्यामुळे हल्लेखोर कोणत्या दिशेने आले, दिसायला कसे होते याचा पोलिसांना कसलाच थांगपता लागत नाही. त्यामुळे पोलीस तपासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत

हल्लेखोर टाकून गेलेले टूव्हीलर पोलिसांनी ताब्यात घेतली असून याच पुराव्याच्या आधारे तपास सुरु आहे. या सर्वच घटनेचा तपास शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून शहापूर पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव आणि त्यांची टीम कसून तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

ससूनमधून पळताना आरोपी महिला आठव्या मजल्यावरुन पडली, अ‍ॅड दीप्ती काळेचा मृत्यू

पाटील दाम्पत्याच्या हत्येचं गूढ पाच दिवसात उकललं, महिलेसह तिघांना अटक

(Shahapur Trader Ramesh Agrawal attack)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.