दहशत! तपासणी केली तर 85 कैदी HIV पॉझिटिव्ह, नेमकं कारण काय?

देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना तिकडे आसाममध्ये जेलमध्ये तब्बल 85 कैद्यांचा रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष गेलं आहे.

दहशत! तपासणी केली तर 85 कैदी HIV पॉझिटिव्ह, नेमकं कारण काय?
प्रातिनिधिक फोटो

दिसपूर (आसाम) : राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचा धोका आहे. खरंतर कोरोनाचा जगभरात धोका आहे. या आजारावर विशिष्ट असं औषध आजही तयार झालेलं नाही. तसाच काहिसा आणखी एक आजार या जगात जिवंत आहे. खरंतर त्याची कोरोनासोबत तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण या आजारावरदेखील एकदम ठळक असं औषध आजही निर्माण झालेलं नाही. त्यामुळे हा आजार अनेक वर्षांपासून संपुष्टात आलेला नाही. या आजाराला एड्स असं म्हणतात. एचआयव्ही या विषाणूपासून या रोगाची लागण होते. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना तिकडे आसाममध्ये जेलमध्ये तब्बल 85 कैद्यांचा रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आता या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष गेलं आहे. त्यामुळे अचानक एवढे रुग्ण वाढण्याचमागचं कारण काय, जेल प्रशासनाची नेमकी भूमिका काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमकं प्रकरण काय?

आसामच्या नगाव केंद्रीय कारागृह आणि विशेष कारागृहात गेल्या महिन्यात तब्बल 85 कैद्यांचा HIV रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. नगांव बीपी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एलसी नाथ यांनी शुक्रवारी (9 ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. एकूण एचआयव्हीची लागण झालेल्या 85 कैद्यांपैकी 45 कैदी हे विशेष कारागृहातील आहेत. तर 40 कैदी हे नगांव केंद्रीय कारागृहातील आहेत. हे सर्व कैदी त्यांच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे संक्रमित झाले आहेत, अशी माहिती डॉ. नाथ यांनी दिली. तसेच गेल्या महिन्यात चार महिलांसह 88 जणांना एचआयव्हीची लागण झाली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

अचानक एवढे कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळण्यामागचं कारण काय?

नगांव आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच एचआयव्हीबाधित कैद्यांना ड्रग्जचं व्यसन आहेत. ते प्रतिबंधित औषधं घेण्यासाठी एकाच सुईचा वापर करतात. त्यामुळे इतक्या जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. आसाम राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने जे आकडे जारी केले आहेत त्यामध्ये 2002 ते 2021 पर्यंत एकूण 20 हजार 85 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग गोयल यांनी दिली आहे. मोरीगाव, नगांव आणि नलबाडी सारख्या जिल्ह्यांमध्ये इंडेक्स टेस्टिंगमुळे एचआयव्हीबाधितांचा आकडा वाढला आहे. जेलमध्ये ड्रग्सचं इंजेक्शन घेतल्यामुळे कैद्यांमध्ये एचआयव्हीचं संक्रमण वाढलं, अशी माहिती देखील अनुराग गोयल यांनी दिली.

HIV विषाणू विषयी थोडक्यात माहिती

एचआयव्ही हा विषाणू आपल्या रोगप्रतिकारशक्तीला हानी पोहोचवतो. त्यामुळे त्याला Human Immunodeficiency Virus म्हणजेच HIV असं म्हणतात. आपल्या शरीरात असलेली रोगप्रतिकार क्षमता आपल्या विविध आजारांपासून वाचवते. ही शक्ती वेगवेगळ्या विषाणूंसोबत दोन हात करते. त्यामुळे आपला अनेका आजारांपासून बचाव होतो. मात्र एचआयव्हीमुळे हीच रोगप्रतिकार शक्ती कमी पडते किंवा या शक्तीला धोका निर्माण होतो. कारण एचआयव्ही विषाणू हे रोगप्रतिकार क्षमतेतील CD4 पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे त्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे आपल्याला विविध आजारांची लागण होते.

हेही वाचा :

नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल

पोलिसांना शिवीगाळ, काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्तींना एक दिवसाची पोलीस कोठडी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI