पोलिसांना शिवीगाळ, काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्तींना एक दिवसाची पोलीस कोठडी

खड्ड्यांविरोधातील आंदोलन केल्यानंतर पोलिसांना शिवीगाळ करणं काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. या दोन महिला कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलांना अटक केली. (congress two women workers abused police, sent to the police custody)

पोलिसांना शिवीगाळ, काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्तींना एक दिवसाची पोलीस कोठडी
kalyan police

कल्याण: खड्ड्यांविरोधातील आंदोलन केल्यानंतर पोलिसांना शिवीगाळ करणं काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. या दोन महिला कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात नेलं असता कोर्टाने या दोन्ही महिला कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

8 ऑक्टोबर रोजी कल्याणच्या रहेजा परिसरातील काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वात खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात पुरुष आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. आंदोलनावेळी बाजारपेठ पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि थोड्यावेळाने सोडून दिलं होतं.

स्वत:च व्हिडीओ केला व्हायरल

या आंदोलनानंतर सोशल मीडियावर काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीचा तिच्या मैत्रीणीसोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. पोलिस व्हॅनमध्ये बसलेली काँग्रेसची महिला कार्यकर्ती तिच्यासोबत व्हॅनमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांना व्हिडीओ दाखविताना या व्हिडीओत दिसते. तर तिच्याशी बोलणारी मैत्रीण पोलिसांना शिव्याची लाखोली वाहताना दिसत आहे. पोलिसांना शिविगाळ, पोलिस व्हॅनला आग लावण्याची धमकी, पोलिसांना मारण्याची धमकी देत असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्याच महिलेने व्हायरल केला.

या व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन अखेर या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी काँग्रेसची ही महिला कार्यकर्ती आणि तिच्या मैत्रिणीला अटक केली. तरन्नूम खान आणि रोशन खान अशी दोघींची नावे असून या दोघीना कल्याण न्यायालयात पोलिसांनी हजर केले. त्यानंतर दोघींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यता आली आहे. या दोघींच्या विरोधात कलम 186, 509, 34 सह माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम 200 चे कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि तिच्या मैत्रिणीकडून पोलिसांच्या विरोधात जे काही वक्तव्य करण्यात आले. त्याच्या सर्व स्तरावर निषेध केला जात आहे.

नालासोपाऱ्यात मोबाईल चोराला बेड्या

दरम्यान, गेल्या महिन्यात नालासोपाऱ्यात एका मोबाईल चोराला काही नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला होता. नालासोपारा पूर्व स्टेशन मार्केट परिसरातील रात्री 8 च्या सुमारास ची ही घटना घडली होती. एक महिला भाजी खरेदी  करत असताना या चोराने तिच्या बेगेतून मोबाईल काढण्याचा प्रयत्न  करत असताना एका सुजाण नागरिकाचा या घटनेवर लक्ष जाताच त्याने चोरट्याला  रंगेहात पकडून चोप दिला.  चोरट्याला बेदम चोप देऊन, पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. हाकेच्या अंतरावर तुळीज पोलीस ठाणे असतानाही, चोरीच्याआ घटना घडत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त निर्माण झाला होता. नालासोपाऱ्यामध्ये वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

 

संबंधित बातम्या:

ठाणे पालिकेत पहिल्यांदाच 170 जणांच्या बदल्या; कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

VIDEO | विवाहितेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, वसईत मनसे कार्यकर्त्यांचा तरुणाला बेदम चोप

नकळत रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि घात झाला, भरल्या घरात संकट ओढावलं, नेमकं काय घडलं?

(congress two women workers abused police, sent to the police custody)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI