AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Murder : शिर आणि जबड्याचा भाग सापडला, 6 महिने आफताबने फ्रिजमध्ये का ठेवलं श्रद्धाचं शिर?

हैवानतेचा कळस! श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने केलेलं हडळकृत्य समोर, पोलीस तपासात विकृती उघड

Shraddha Murder : शिर आणि जबड्याचा भाग सापडला, 6 महिने आफताबने फ्रिजमध्ये का ठेवलं श्रद्धाचं शिर?
महत्त्वपूर्ण खुलासाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 21, 2022 | 11:00 AM
Share

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder News) प्रकरणी पोलिसांच्या तपासात रविवारी मोठा सुगावा हाती लागलाय. महरौली जंगल परिसरात पोलिसांनी एक शिर आणि एका शरिराच्या जबड्याचा अवयव ताब्यात घेतला. मोठ्या शोध मोहिमेनंतर हे दोन अवयव (Murder Mystery) पोलिसांच्या हाती लागलेत. दरम्यान, हे दोन्हीही ताब्यात घेण्यात आलेले अवयव श्रद्धाचेच आहेत का? याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र हा खुलासा करण्यासाठी सध्या फॉरेन्सिक पथकाकडून पुढील तपास केला जातोय. सध्या दिल्ली पोलिसांना (Delhi Police) फॉरेन्सिक पथकाच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. मात्र जर या दोन्ही अवयवांबाबत दिल्ली पोलिसांना वाटत असलेला संशय खरा ठरला, तर तो या हत्याकांडातील आतापर्यंतच्या तपासातील टर्निंग पॉईन्ट ठरेल.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर या तरुणीचा लिव्ह ईन पार्टनर आफताब पुनावाला पोलिसांसमोर एकदम नॉर्मल वावरत असल्याचंही कळतंय. जणू काही घडलंच नाहीये, अशा पद्धतीने आफताब पुनावाला पोलिसांना उत्तर देत असल्यानं पोलीसही संभ्रमात पडलेत.

आफताब पुनावाला मानसिक रुग्ण असण्याची दाट शक्यता असल्याची भीतीही पोलिसांना वाटतेय. त्यातूनच त्याने हे थरकाप उडवणारं कृत्य केलं असावं, असाही तर्क बांधला जातोय.

आरोपीने श्रद्धाच्या हत्येनंतर तिच्या शरीराचे बहुतांश तुकडे हे छत्तरपूर येथील जंगलात फेकले होते. पण डोकं, धड आणि हाता पायाची बोटं कापून फ्रिजमध्ये ठेवली होती, अशी माहिती ‘अमर उजाला’ या संकेतस्थळावरील एका रिपोर्टमधून देण्यात आलीय. त्याने हे सर्व तुकडे 18 ऑक्टोबर रोजी फेकल्याचही सांगितलं जातंय.

या दरम्यान, आरोपीने एखाद दुसरी वेळ सोडली तर फ्रिज अजिबात उघडला नव्हता. या फ्रिजमध्ये खाण्यापिण्याचीही कोणती वस्तू ठेवण्यात आली नव्हती.

एक-दोन वेळा फ्रिज उघडून आरोपीने शीर आणि धड बाहेर काढलं होतं. ते बॅगमध्ये भरुन तो फेकण्यासाठी घरातून निघालाही. पण आपल्यावर कुणाची तरी पाळत असल्याचा संशय आल्यानं आरोपी पुन्हा माघारी परतला होता. विशेष म्हणजे एक मैत्रिण जेव्हा घरी आली होती, तेव्हा आरोपीने तिला घरातील फ्रिज खराब आहे, असंही सांगितलं होतं.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जून महिन्यात मुंबईत गेला. त्याआधी तो श्रद्धासोबत उत्तर भारत फिरुन आलेला. वसईतील भाड्याच्या घरात जाऊन तिथलं सामान तो आपल्या स्वतःच्या घरात ठेवून आला होता. पती-पत्नी असल्याचं सांगून वसईत आरोपीनं एक भाड्याचं घर घेतलं होतं आणि तिथेच ते दोघे राहत होते.

तूर्तास पोलिसांना महरौली जंगलात एक जबडा आणि काही हाडांचे अवशेष सापडलेत. हे अवशेष नेमके कुणाचे आहेत याचा तपास सुरु आहेत. फॉरेन्सिच चाचणीच्या अहवालानंतर नेमकी आता या अवशेषांबाबत का माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.