AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला

संतोष जाधव हा सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहे. 2021साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या ओंकार बाणखेले हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती.

Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवाला हत्या आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला
संतोष जाधवला अटकImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 28, 2022 | 2:56 PM
Share

पुणे : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या(Sidhu Musewala’s murder Case) प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून(Omkar Bankhele murder case) प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव(Sunil Jadhav) याला विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सोमवारी त्याची पोलिस कोठडी संपत आहे. या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून कोर्टाने त्याच्या कोठडीचा कालावधी आणखी 14 दिवसांसाठी वाढला आहे.

राण्या बाणखेलेच्या खुनानंतर संतोष फरार झाला होता. संतोषला आश्रय देणाऱ्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले आहेत.

पोलिस महिनाभर संतोष जाधवचा शोध घेत होते

संतोष जाधव हा सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहे. 2021साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या ओंकार बाणखेले हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती.

संतोष जाधवला कुठून अटक?

संतोष जाधव याला गुजरातमधून पअटक करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटक केली होती. गुजरातमधील मांडवी तालुक्यामध्ये असलेल्या नागोर गावातून संतोष जाधव याला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पुणे पोलिसांसोबत मुंबई पोलीस, पंजाब पोलीस आणि हरयाणा पोलीस संतोष जाधवची चौकशी केली जातेय.

गँगस्टर ते वेटर

गँगस्टर म्हटला की डोळ्यासमोर येतो तो भाईगिरी करणारा, दरारा असणारा गुंड. हातात, गळ्यात जाडजुड चैन, बोटांमध्ये अंगठ्या, महागडे गॉगल, मोबाईल, गाड्या, शिवाय ऑर्डर सोडल्या सोडल्या ऐकतील अशी गावगुंडांची गँग सोबत ठेवणारा, असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण हे चित्र संतोष जाधवच्या बाबतील अगदी उलट झालं होतं.

गुजरातमध्ये दबा धरुन बसलेल्या पुण्याचा गँगस्टर संतोष जाधव एका हॉटेलात वेटरचं काम करत होता. कुणालाही शंका येऊ नये म्हणून त्यानं जगण्यासाठी चक्क एका अत्यंत सामान्य हॉटेलात काम सुरु केलं होतं. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असल्यामुळे नाईलाजाने त्याला हे काम करावं लागत होतं. इतकंच काय तर मोबाईलचा साधा रिचार्ज करण्याइतकेही पैसे त्याकडे नव्हते. हॉटेलमध्ये पडेल ते काम करायचं आणि हॉटेल बॉयप्रमाणे झोपायचं, अशी संतोष जाधवची अवस्था झाली होती. कुणीतरी त्याला मोबाईल रिचार्ज करुन द्यायचं.

बिष्णोई गँगमध्ये आश्रय

ओंकार बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोष जाधव फरार झाला. तो देशभर फटकत राहिला. अटकेच्या भीतीने लपत राहिला. अखेर त्याला लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने सहारा दिला. पण तिथेही त्याची फरफट सुरुच राहिली. बिष्णोई गँगच्या सांगण्यावरुन संतोष जाधवने दरोडे घालणं, जबरी चोऱ्या करणं, असे गुन्हे सुरुच ठेवले होते. पण त्याचं सगळं आयुष्यच उधारीवर सुरु होतं.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्याचं कळल्यानंतर संतोष जाधवला एका छोट्याशा हॉटेलमधून जेवणं दिलं जात होतं. त्यातही दोन्ही वेळेला त्याला दोन वेगवेगळ्या हॉटेलातील जेवणावर अवलंबून राहावं लागलं होतं. सकाळी एका तर रात्री दुसऱ्या हॉटेलात त्याला जेवणं दिलं जायचं. संतोष जाधवप्रमाणे बिष्णोई गँगमधील अनेक गावगुंडांचा वापर करुन त्यांना कचरा फेकल्यासारखं फेकून दिलं जात होतं, हे देखील पोलिसांच्या तपासात समोर आलंय.

हत्येनंतर खंडणी मागण्याचा धंदा

ओंकार बाणखेले खून प्रकरणार फरार असलेल्या संतोषला बिष्णोई गँगने आश्रय दिला. त्यानंतर संतोष जाधवने पैसे मिळवण्यासाठी खंडणी मागून व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रकारही केला होता. जुन्नर तालुक्याती एका व्यावसायिकाला धमकावण्याचा प्रकार अटकेच्या पाच सहा महिने आधीच संतोषने केला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.