Bhandara Youth : भंडाऱ्यात मासेमारी गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात अडकले, बचाव कार्य सुरु

पवनी तालुक्यातील पाथरीचे काही मासेमारी करणारे इसम वैनगंगा नदीत मासेमारी करीता गेले होते. सतत मुसळधार पाऊस होत असल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली. यामुळे सदरचे 06 इसम पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकून पडले.

Bhandara Youth : भंडाऱ्यात मासेमारी गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात अडकले, बचाव कार्य सुरु
भंडाऱ्यात मासेमारी गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात अडकले
Image Credit source: TV9
तेजस मोहतुरे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 19, 2022 | 12:13 AM

भंडारा : मासेमारीसाठी गेलेले सहा तरुण पुरा (Flood)च्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्या (Stuck)ची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे. अडकलेल्या तरुणांच्या बचावासाठी SDRFचा एक चमू पाचारण करण्यात आला आहे. राज्यात पावसाचे थैमान सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. असे असतानाही हे तरुण मासेमारीसाठी (Fishing) नदीत गेले होते. यावेळी पाण्याची पातळी वाढल्याने हे सर्व तरुण नदीच्या पाण्यात अडकले. अडकलेले सर्व इसम पवनी तालुक्यातील पाथरीचे रहिवासी आहेत. नदीची पाणी पातळी वाढल्याने आणि अंधार असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.

एसडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरु

पवनी तालुक्यातील पाथरीचे काही मासेमारी करणारे इसम वैनगंगा नदीत मासेमारी करीता गेले होते. सतत मुसळधार पाऊस होत असल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली. यामुळे सदरचे 06 इसम पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकून पडले. सदर इसमांना बाहेर काढण्याकरीता भंडारा जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करीत आहे. मात्र रात्र असल्याने आणि नदीच्या पात्रात पाणी वाढल्या बचाव कार्य करण्यास अडसर निर्माण होत असल्याने बचाव कार्य संथ गतीने सुरु आहे. सदर इसमांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे एक चमू तैनात करण्यात आला आहे.

जळगावमध्ये गारबर्डी धरणावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका

जळगावमध्येही पर्यटनासाठी गारबर्डी धरणावर गेलेले 9 पर्यटक नदीच्या पाण्यात अडकून पडले होते. मात्र स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने अथक प्रयत्नांनी सर्वांची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेले सर्व तरुण मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत. (Six youths who went fishing in Bhandara got stucked in the flood water)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें