AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामीशी नजर भिडली अन् मोठा प्लान ठरला, मामाला पाण्यात ढकलताना… काय घडलं तळ्याकाठी?; सोलापुरात का होतेय मामा-भाच्यांची चर्चा?

19 तारखेपासून गायब झालेल्या मामा-भाच्यांचा अखेर शोध लागला आहे. दोघांचेही मृतदेह महागाव तलावात आढून आले आहे आहेत. दोघांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धक्कादायक माहिती समोर आली. सोलापुरात सध्या हे प्रकरण चांगलंच गाजत आहे.

मामीशी नजर भिडली अन् मोठा प्लान ठरला, मामाला पाण्यात ढकलताना... काय घडलं तळ्याकाठी?; सोलापुरात का होतेय मामा-भाच्यांची चर्चा?
| Updated on: Feb 26, 2025 | 1:48 PM
Share

अनैतिक संबंध फारसे टिकत नाहीत. त्याचा कधी ना कधी पर्दाफाश होतोच. कुणी कितीही हे संबंध लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी प्रकरण उजागर होतंच. कधी कधी तर प्रेमसंबंधातून इतरांच्या काटा काढण्यासाठी गेलेल्यांचाच काटा निघतो. सर्व प्रकरण अंगाशी येते. सोलापुरातही असंच काही तरी घडलं. भाच्याची मामीशी नजर भिडली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. मग भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लान रचला. प्लान एकदम जबरदस्त होता. या प्लाननंतर आपण मामीसोबत लग्न करून सुखी संसार थाटू असं भाच्याला वाटू लागलं. पण या प्लानमुळे आपणच या जगात राहणार नाही हे त्याला कुठे माहीत होतं? असं काय घडलं सोलापुरात?

बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण हा घातपात तर नाही ना? याची पोलिसांना शंका आली. पोलिसांनी त्या दिशेने तपासही सुरू केला आणि जी धक्कादायक घटना समोर आली त्याने पोलीस हादरून गेले. भाच्याचं मामीवर प्रेम होतं. दोघांचेही संबंध सुरू होते. मामा प्रेमसंबंधात अडसर होता. तर मामीला मामाकडून सातत्याने मारहाण सुरू होती. त्यामुळेच भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लान रचला होता.

पडताना मामाने…

प्लाननुसार मामा आणि भाच्याने भरपूर दारू घेतली. दोघेही महागाव तलावाजवळ आले. तिथेही दारू प्यायल्याचं समजतं. मामा नशेत तर्रर होता. त्याला चढली होती. त्यामुळे भाच्याने मामाला तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला. मामा तलावात पडलाही, पण पडताना त्याने भाच्यालाही तलावात ओढलं. तलावाचं पाणी खोल होतं. दोघांनाही पोहायला येत नव्हतं. त्यामुळे दोघांचाही तलावत बुडून मृत्यू झाला.

मामी अखेर बोलली

भाच्याचं नाव गणेश सपाटे आहे. तर मामाचं नाव शंकर पटाडे आहेत. दोघेही 19 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. दोघेही सापडत नव्हतं. दोन दिवसानंतर दोघांचेही मृतदेह तलावात तरंगताना दिसले. गावकऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाला पाठवला. याबाबत पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे अधिकच फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी मामी रुपाली राठोड हिचीही चौकशी केली. त्यावेळी तिने संपूर्ण गुन्ह्याची कबुली देत अख्खा प्लानच पोलिसांसमोर मांडला. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली असून तिला 27 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.