बायकोला कोरोना ड्युटी का लावली? शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण

शिक्षक पत्नीला कोव्हीडचा सर्वे करण्याचे काम दिल्याबद्दल रागातून आरोपी सद्दाम जाकीर नाईकवाडी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.

बायकोला कोरोना ड्युटी का लावली? शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण
तक्रारदार मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख

सोलापूर : शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली, असा प्रश्न विचारत मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरमधील सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Head master beaten up by Teacher’s husband for giving COVID Duty)

नेमकं काय घडलं?

मारहाण प्रकरणी सद्दाम जाकीर नाईकवाडी याच्याविरोधात सोलापूरच्या जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला कोव्हीडचा सर्वे करण्याचे काम दिल्याबद्दल नाईकवाडीचा मुख्याध्यापक शेख यांच्यावर राग होता. यातूनच नाईकवाडी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.

रोटेशन पद्धतीनेच ड्युटी

सोलापूरमध्ये कोरोनासंबंधी सर्वेक्षणाच्या कामासाठी सोशल शाळेतील 27 शिक्षक कार्यरत आहेत. रोटेशन पद्धतीने महिनाभर प्रत्येकाची ड्युटी असते. परंतु शिक्षक पत्नीला कोरोनाची ड्युटी लावल्याच्या संतापातून सद्दाम जाकीर नाईकवाडी यांनी थेट मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण केली.

बीडमध्ये मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला शिवीगाळ

दरम्यान, शाळेत हजेरी का घेतली नाही? या क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापिकेच्या पतीने शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मुख्याध्यापिकेचे पती केशव भांगे हे याच शाळेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी शहरात ही धक्कादायक घटना घडली होती.

शिक्षक सतीश जाधवांचा आरोप काय?

“16 तारखेला मी घरी येत असताना संस्थाचालकांचे चिरंजीव केशव भांगे यांचा मला फोन आला. त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी मला अर्वाच्च, जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांनी मला आणि कुटुंबाला संपवण्याची भाषा केली. माझी नोकरी घालवण्याचीही धमकी दिली. शाळेत आलास, तर गेटवरच खल्लास करेन, असं धमकावलं. कारण काय, तर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणजे त्यांच्या पत्नीच्या वर्गाची हजेरी का घेतली नाही. तू आमचा गुलाम आहेस, नोकर आहेस, तुला असं वागावंच लागेल, असं म्हणाले. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करायची आहे, की त्यांनी माझ्यासह कुटुंबाला संरक्षण देऊन न्याय द्यावा” अशी मागणी तक्रारदार सतीश जाधव यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

शाळेत हजेरी का घेतली नाही? मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ

… तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, औरंगाबादेत धक्कादायक प्रकार

पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण, अहमदनगरमध्ये गुन्हा

(Solapur Head master beaten up by Teacher’s husband for giving COVID Duty)