AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावयाने कमाल केली सासू पळून नेली… रोज 20 तास बोलायचे, लग्नाआधीच काय घडलं त्या घरात?

'माझी आईच माझं आयुष्य उद्ध्वस्त करुन गेली...', जावयासोबत सासू गेली पळून, लग्नाआधी 'त्या' घरात घडली थक्क करणारी घटना... पोलीस स्थानकात तक्रार दाखल... पोलीस करत आहेत कसून चौकशी...

जावयाने कमाल केली सासू पळून नेली... रोज 20 तास बोलायचे, लग्नाआधीच काय घडलं त्या घरात?
| Updated on: Apr 09, 2025 | 12:21 PM
Share

अलीगडमधील एका आईने असं काही केलं ज्याची कल्पनाही करता येणार नाही. लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबत आई पळून गेली. मुलीच्या लग्नाची तारिख जवळ येत असल्याचं लक्षात येताच आई जावयासोबत पळून गेली. दोघांत्या लव्ह कनेक्शनचं माध्यम होतं स्मार्टफोन… जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.

रोकड आणि दागिने घेवून सासू – जावई फरार…

ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे, जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.

जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.

त्यानंतर नवरा मुलगा देखील त्याच्या घरातून पळून गेला आहे… असं कळलं… अनेक ठिकाणी विरपूस केल्यानंतर, मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर, एक धक्कादायक सत्य समोर आलं. पत्नी आणि होणारा जावई एकत्र पळून गेले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे काही दिवसांपूर्वी महिलेच्या जावयाने तिला एक महागडा स्मार्टफोन भेट दिला होता आणि त्याच फोनद्वारे दोघेही रात्रंदिवस संपर्कात राहिले.

मुलीचे वडील जितेंद्र म्हणाले, ‘मी बंगळुरूमध्ये काम करतो आणि महिन्यातून एक-दोन वेळा घरी येतो. मी मागच्या वेळी आलो तेव्हा मी पाहिले की माझी बायको माझ्या मुलीचे लग्न ज्या मुलाशी ठरले होते त्याच्याशी जास्त बोलत होती. पण मी दुर्लक्ष केलं…’

‘पण जेव्हा मला कळलं नवरा मुलगा दिवसातील 24 तासांमध्ये 20 – 22 तास सासूसोबत बोलतोय. माझ्या मुलीसोबत फार कमी बोलत आहे, तेव्हा संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आलं. लग्नासाठी घरातील पैसे देखील घेवून गेली आहे. आता सर्वकाही संपलं आहे. माझ्या मुलीचं लग्न मोडलं आहे आणि माझी अभ्रू देखील गेली आहे…’

मुलगी शिवानी म्हणाली, ‘माझ्याच आईने माझं आयुष्या उद्ध्वस्तत केलं आहे. जेव्हा मी मुलाला विचारायची काय करतोय, तेव्हा त्याचं एकच उत्तर असायचं आणि ते म्हणजे लग्नाच्या कामात व्यस्त आहे. पण तो माझ्या आईसोबत व्यस्त असायचा. आई सर्वकाही त्याच्या सांगण्यावर केलं आहे. आता माझ्या आयुष्यात तिचं काहीही महत्त्व नाही. आम्हाला फक्त आमचं सामान हवं आहे…’

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. महिला आणि तरुणाचा शोध सुरु आहे. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरु आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा