बॉबी देओलचा ‘तो’ थ्रिलर चित्रपट पाहिला अन् सोनमने पतीला मारण्याचा कट रचला
मेघालयात राजा रघुवंशीची निर्घृण हत्या प्रकरणाने सर्वांनाच हादरवलं आहे. त्याची पत्नी सोनमनेच या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. तिने बॉलिवूडच्या एका चित्रपटावरून पतीच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. कोणता आहे तो चित्रपट आणि त्यावरून कसा रचला हत्येचा कट पाहुयात.

Sonam plotted to kill her husband over the Bollywood film HumraazImage Credit source: tv9 marathi
मेघालयात राजा रघुवंशीची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली त्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. लग्नाला काही दिवसच झाले होते पण सोनमने ज्यापद्धतीने हत्येचा कट रचला ते अत्यंत भयानक आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे की सोनमने पोलिसांसमोर आपले गुन्हे कबूल केले आहेत. तिने कबूल केले आहे की तिनेच राजाच्या हत्येची सुपारी दिली होती. एवढंच नाही तर बॉलिवूडचा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहिल्यानंतर सोनमने तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला होता, अशी मोठी माहिती समोर आली आहे.
सोनमने शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा कट रचला
हे प्रकरण सोडवताना मेघालय पोलिसांना ही माहिती मिळाली की सोनमने शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा कट रचला. सर्व काही 23 मे रोजी घडले. जिथे तिने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि तीन मारेकऱ्यांसह संपूर्ण योजना आखली होती. सीसीटीव्ही फुटेज, रेनकोट, रक्ताने माखलेले कपडे आणि अशा अनेक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना ही सर्व माहिती मिळाली आणि या प्रकरणाचा अखेर खुलासा झाला.
हा चित्रपट पाहिल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला मारले
या प्रकरणातील सर्वांत मोठी अपडेट म्हणजे की सोनमने बॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचं तिन कबूल केलं. ही माहिती या प्रकरणातील खरोखरच सर्वात धक्कादायक माहिती होती. सोनमने जो चित्रपट पाहून हत्येचा प्लान केला तो चित्रपट म्हणजे बॉबी देओलचा ‘हमराज’. राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिन रघुवंशी याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. सचिनने सांगितले की सोनमने राजाच्या छंदाच्या कमकुवतपणाचा ढाल म्हणून वापर केला आणि त्याला मेघालयात घेऊन गेली जेणेकरून ती डोंगरांच्या शांततेत तिचा प्लॅन पूर्ण करू शकेल.
सचिनने सांगितले की राजाची निवड ढाल म्हणून केली होती
राजाला ट्रेकिंगची आवड होती. म्हणून सोनमने एक योजना आखली की ती राजाला डोंगरावर आणि घरापासून मैल दूर ट्रेकिंगसाठी घेऊन गेली. सुरुवातीला तंत्र मंत्राची मदतही घेण्यात आली आणि नंतर कामाख्या मंदिरात दर्शन घेण्यासाठीही गेले. आणि नंतर राजाचा बळी दिला असं म्हटलं आहे. राजाच्या डोक्यात एका शस्त्राने हल्ला करण्यात आला.
- Humraaz
‘हमराज’ पाहिल्यानंतर सोनमने एक कट रचला
‘हमराज’ हा बॉलिवूड चित्रपट जवळपास सर्वांनीच पाहिला असेल. तो सिनेमा पाहून सोनमच्या डोक्यात हल्ल्याचा प्लान शिजला आणि तिने हा प्लान सत्यात उतरवण्याचं ठरवलं. ‘हमराज’ हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक थ्रिलर चित्रपट असून ज्याचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. या चित्रपटात बॉबी देओल, अक्षय खन्ना आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट ‘अ परफेक्ट मर्डर’ या अमेरिकन चित्रपटावरून घेण्यात आला होता.
‘हमराज’ हा थ्रिलर चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट 15 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता तर त्याने जगभरात त्याकाळी 30 कोटींची कमाई केली आणि हिट चित्रपटाचा किताब मिळवला. तो त्या वर्षीचा 7 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आजही हा चित्रपट पसंतीच्या लिस्टमध्ये आहे.
‘हमराज’ मधील पात्रांसारखीच कथा
सोनमने हाच चित्रपट पाहून हीच कथा खऱ्या आयुष्यात उतरवली आणि आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. जसं की, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड योजना आखतात की पैशांसाठी एका श्रीमंत व्यावसायिकाला फसवायचं. चित्रपटात दाखवलेलं प्रियाचं पात्र अमिषा पटेल, नंतर राज सिंघानिया बॉबी देओल. हे दोघे लग्न करतात. ती हे लग्न पैशासाठी आणि तिच्या योजनेनुसार करते. जेणेकरून नंतर ती राजला मारून त्याला मार्गातून काढून तिच्या बॉयफ्रेंड म्हणजे अक्षय खन्नाकडे परत येऊ शकेल. पण हा एक चित्रपट होता. काल्पनिक होता. पण खऱ्या आयुष्यात राजा रघुवंशीला कोणीही वाचवू शकले नाही. पण अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सोनमचा हा गुन्हा कबूल करूनच घेतला.