AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी पलटी झाल्याने पालक घाबरले, घटनास्थळी जमलेल्या लोकांना अपघात पाहून घाम फुटला

बुलढाणा जिल्ह्यात एसटीचा आज सकाळी सात वाजता अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पालकांसह इतर नागरिकांनी गर्दी केली आहे. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

एसटी पलटी झाल्याने पालक घाबरले, घटनास्थळी जमलेल्या लोकांना अपघात पाहून घाम फुटला
ST ACCIDENT NEWSImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 16, 2023 | 9:59 AM
Share

गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा (BULDHANA) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी एसटी पलटी झाली, त्या एसटीत विद्यार्थी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघात झालेल्या एसटीत (ST Accident News) जवळपास २५ च्या पुढे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना (student injured) जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटीचा चालक सुध्दा गंभीर जखमी झाला असून एसटीचं स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं चालकाने सांगितलं आहे. काही विद्यार्थी गंभीर असल्यामुळे पालक चिंतेत आहे.

चालू गाडीचं स्टेअरिंग लॉक

बुलढाणा जिल्ह्यात सवणा ते चिखली या दरम्यान एस टी बसचा अपघात झाला आहे. चालू गाडीचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळं हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. अपघातमध्ये दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सहा विद्यार्थी गंभीर तर चालक सुद्धा जखमी झाला आहे. बस सवणा येथून चिखली कडे जात होती. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करीत होते. सकाळी सात वाजता ही घटना घडली आहे. ज्यावेळी अपघात झाल्याची माहिती समजली त्यावेळी नातेवाईकांनी तिथं गर्दी केली होती.

एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे…

अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी झुडपं आली आहेत. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडून देण्यात आलं आहे. एसटी बस दुपारपर्यंत तिथून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच