Video : नदीवर जीव द्यायला गेला मात्र तिथं देवदूत आला, युवकाला वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद

Video : नदीवर जीव द्यायला गेला मात्र तिथं देवदूत आला, युवकाला वाचवतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद
नाशिकात तरुणाला वाचवण्यात यश
Image Credit source: tv9

एक युवक वैयक्तीक आयुष्याला कंटाळून (Suicide Try)  जीव द्यायला थेट नदीवर पोहोचला. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून सर्वच हैराण झाले आहे. हा संपूर्ण थरार एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झालाय.

उमेश पारीक

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 17, 2022 | 9:05 PM

नाशिक : आपल्या मराठीत एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी? असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आलाय. एक युवक वैयक्तीक आयुष्याला कंटाळून (Suicide Try)  जीव द्यायला थेट नदीवर पोहोचला. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून सर्वच हैराण झाले आहे. हा संपूर्ण थरार एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झालाय. मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्याजवळ कादवा नदीपात्राचा पूल आहे. याच पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणास तेथून जाणाऱ्या एका तरुणाने जीवदान दिलंय. अजय जाधव या व्यक्तीने त्यास चाणक्यपणे पकडले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले. घरगुती वादातून (Family Dispute) आत्महत्या करण्याचा या तरुणाचा हेतू होता. मात्र हा तरुण ऐनवेळी देवदूत पोहोचवा तसा या ठिकाणी पोहोचला आणि एकाचा जीव जाता जाता वाचला.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

नेमका प्रकार काय घडला?

पिंपळगाव बसवंत शहरातील कादवा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्येच्या तयारीत असलेल्या राकेश आहिरे या युवकामुळे थोडक्यात वाचलाय. याचे प्राण वाचविण्यात स्थानिक तरुणांना यश आले असून व्हायरल झालेल्या व्हिडीओतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडिओत दिसतंय की हा जीव द्यायला नवीच्या कठड्यावर चढला आहे. मात्र पुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांनी दुचाकी पार्क करत क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी धाव घेतली. आणि पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या युवकाचा हात घरून ठेवीत परिसरात आरडाओरड केली. यावेळी इतरही काहीजण मदतीला धावून आल्याचे दिसते. या तरुणांच्या साथीदाराच्या मदतीने आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यास अजय जाधव व नाझीम अत्तर या युवकांना यश आल्याने त्यांचे सर्वस्त्रातून कौतुक होत आहे.

तरुणाचं टोकाचं पाऊलं

आजची तरुणाई रागाच्या भरात अनेकदा टोकाचे पाऊल उचलताना दिसते. त्यासाठी अनेक कारणं असतात. कधी घरगुती वाद कारणीभूत असतो. तर कधी वयक्तीत आयष्यातील अडचणी अशा घटनेला कारणीभूत असतात. तर कधी आर्थिक अडचणी किंवा करिअरचे अपयशही अशी पाऊलं उचलण्यास भाग पाडतं. मात्र अशावेळी संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तरच अशा घटना टाळता येतील. काही वेळेला अशा घटना घडत असताना अनेकजण बघ्याची भूमिका घेतात. मात्र तरुणांनी चालाखी दाखवत या तरुणाचा जीव वाचवला. माणूसकी आणि दक्ष नागरिांचं कर्तव्य अशा दोन्ही बाजु सांभाळत सर्वांची मनंही जिंकली.

Wardha Police | अपघातस्थळावरुन परत येत असतानाच अपघात! 3 पोलीस जखमी, थोडक्यात बचावले

Video : अकोल्यातले चोर “तिसऱ्या डोळ्याला”ही घाबरेनात, चोरांच्या रडारावर आता मंदिरातल्या दानपेट्या

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये तस्करांच्या मनसुब्यावर पाणी, 40 सोन्याची बिस्कीटं जप्त

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें