ऐका ना.. लस्सी प्या ना ! आधी पतीला ते ड्रिंक पाजलं, नंतर पत्नीने जे केलं… संपूर्ण गावच हादरलं
Devar Exposed Bhabhi : उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये, एका नवविवाहित महिला लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या आतच तिच्या प्रियकरासह पळून गेली. तिच्या मेहुण्याने शेजारच्या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा तिच्या कुटुंबाला तिच्या कृत्याची माहिती कळली. विवाहित महिलेने तिच्यासोबत रोख रक्कम आणि दागिनेही नेले आहेत.

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लग्नानंतर अवघ्या 2 महिन्यांच्या आतच नवविवाहित महिला पळून गेली. तिने रात्री उशिरा तिच्या प्रियकराला सासरी बोलावलं आणि नंतर अंधाराचा फायदा घेत ती त्याच्यासोबत पळून गेली. पण ती पळून गेली तेव्हा तिच्या सासरच्यांना काहीच कळलं नाही, असं कसं घडलं ? कारण पळून जाण्याआधी तिने जे केलं त्यामुळे सगळेच हैराण झाले होते. पिर्यकरासोबत पळून जाण्याआधीच विवाहित महिलेने रात्री लस्सीमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या आणि सर्वांना ती लस्सी पाजली होती.
ती पिऊन सगळेच बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा कुटुंब शुद्धीवर आले तेव्हा सून बेपत्ता होती. अखरे त्या घराच्या आसपासच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सुनेचे कृत्य उघडकीस आले. विवाहित महिलेने रोख रक्कम आणि दागिनेही सोबत नेले होते. अखेर तिच्या दीराने आपल्याचे वहिनीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सारवा गावातील आहे. माझा मोठा भाऊ सलमानची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. आणि तिने घरात ठेवलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम सोबत नेली आहे, अस त्या महिलेच्या दीराने पोलिसांना सांगितलं. सलमान हा सुतारकाम करतो.
अवघ्या 2 महिन्यात नववधू पळाली…
दीर आरिफच्या सांगण्यानुसार, 25 एप्रिल रोजी सलमानचे लग्न लोणी येथील एका मुलीशी झाले होते. मात्र दोन महिन्यांनी, शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास, विवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरी उपस्थित असलेल्या सर्वांना लस्सी प्यायला दिली. मात्र सकाळी उठल्यावर सर्वांना धक्का बसला कारण सलमानची पत्नी, घरातून गायब होती. लग्नानंतर अवघ्या 50 दिवसांतच, नवविवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. जाण्यापूर्वी तिने लस्सीमध्ये नशेचे औषध मिसळून ते संपूर्ण कुटुंबाला दिलं आणि बेशुद्ध केलं. रात्री 1 वाजता तिचा प्रियकर दुचाकीवरून आला आणि नवविवाहित महिलेला पळवून नेताना शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अखेर तिच्या दीराने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. ते सीसीटीव्ही फुटेज पाहणारा मी पहिला होतो. माझ्या वहिनीने जे केले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अखेर मी तो व्हिडिओ कुटुंबालाही दाखवला. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सीओ सिटी जितेंद्र शर्मा यांनी माहिती दिली. सारवा हे नागोला चौकीजवळील एक गाव आहे. येथे सना नावाच्या मुलीचे लग्न सलमानशी झाले होते. सना स्वतः गाझियाबादची रहिवासी आहे. लग्नापूर्वीच तिचे सुहेलशी प्रेमसंबंध होते.तिचा प्रियकर हापूरमधील सिम्भवली वैथचा रहिवासी आहे, जो लोणीमध्ये एसी दुरुस्तीचे काम करायचा. ईदच्या एक-दोन दिवस आधी, सुहेल शिलाई मशीन दाखवण्याच्या बहाण्याने मुलीच्या सासरच्या घरी आला. सलमानच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला त्यावेळी पाहिले होते. पण सनाचं सुहेलसोबत काय नातं आहे हे त्यांना माहित नव्हते. सध्या त्या दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
