अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि मारहाण प्रकरण, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कारवाईत कसूर करणाऱ्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि मारहाण प्रकरण, चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चार पोलिसांवर निलंबनाची कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 10:53 AM

सोलापूर / सागर सुरवसे : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी कारवाईत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बार्शी शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस अंमलदार अशा चौघांना निलंबित करण्यात आलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही कारवाई केली आहे.

मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती

बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षय माने, नामदेव दळवी या दोघांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना तात्काळ अटक करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी अटक न केल्याने दुसऱ्या दिवशी या आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

अत्याचाराची तक्रार दिल्याच्या कारणातून मुलीवर हल्ला

मुलीचे आई-वडिल याच तक्रारीसंदर्भात पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत आरोपींनी घरात घुसून सत्तार आणि कोयत्याने मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली असती, तर कदाचित हा हल्ला झाला नसता अशी टीका सर्वत्र होऊ लागली.

हे सुद्धा वाचा

चार पोलिसांचे निलंबन

यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे आणि बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुल, पोलीस अंमलदार अरुण माळी अशा चार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. कर्तव्यात कसूर करणे, आरोपींना अटक करण्यात विलंब करणे या कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.