पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, स्वत:च्याच गाडीमध्ये आढळला मृतदेह, बुलढाणा हादरलं
देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. स्वत:च्याच स्विप्ट गाडीमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. स्वत:च्याच स्विप्ट गाडीमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर म्हस्के असं या मृत पोलिसाचं नाव आहे, ते गिरोली खुर्द येथील रहिवासी होते. ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना जिल्ह्यात हाय वे पोलिसात कार्यरत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मस्के यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रस्त्यावरील आर जे इंटरनेशनल स्कूल जवळील वनविभागाच्या जागेत स्वतःच्या स्विफ्ट गाडीतच पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर म्हस्के वय 35 वर्ष , राहणार गिरोली खुर्द असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना जिल्ह्यातील हाय वे पोलीसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे . त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यांचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळून आला आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
परिसरात भीतीचं वातावरण
पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळून आला. त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, या प्रकरणात तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
