युपीतील महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये संशयास्पद मृत्यू

भावना तिच्या सहकारी महिला खेळाडूंसोबत वॉर्ड क्रमांक मध्ये भाड्याच्या घरात राहत होती. शुक्रवारी संध्याकाळी ती अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाथरुममधून बाहेर आली नाही. मुलींनी अनेकदा दरवाजाही ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने तिच्या सहकारी खेळाडूंनी घरमालकाला बोलावले.

युपीतील महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये संशयास्पद मृत्यू
युपीतील महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये संशयास्पद मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 4:04 PM

सोनीपत : हरियाणातील सोनीपतमधील रेसलर निशा दहिया हत्या प्रकरण शांत होते न होते तोच आणखी एका महिला खेळाडूच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. मूळची यूपीची असलेल्या 21 वर्षीय महिला बॉक्सरचा सोनीपतमध्ये मृत्यू झाला. भावना असे मयत महिला बॉक्सरचे नाव आहे. भावना शुक्रवारी संध्याकाळी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेली होती. बराच वेळ बाहेर आली नाही म्हणून तिच्या सहकारी खेळाडूंनी जाऊन पाहिले असता भावना मृतावस्थेत आढळली.

मूळची यूपीची रहिवासी होती भावना

भावना मूळची यूपीतील बागपत जिल्ह्यातील मवीकला गावची रहिवासी आहे. सध्या सोनीपत येथील खरखौदामधील केएस अॅकॅडमीत बॉक्सिंगचा सराव करीत होती. भावना अडीच महिन्यांपूर्वीच यूपीतून सोनीपतमध्ये आली होती. येथे भाड्याच्या घरात राहत होती. प्राथमिक तपासात डोक्यातील नस फाटल्यामुळे भावनाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भावनाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सहकारी महिला खेळाडूंसोबत भाड्याच्या घरात राहत होती

भावना तिच्या सहकारी महिला खेळाडूंसोबत वॉर्ड क्रमांक मध्ये भाड्याच्या घरात राहत होती. शुक्रवारी संध्याकाळी ती अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाथरुममधून बाहेर आली नाही. मुलींनी अनेकदा दरवाजाही ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने तिच्या सहकारी खेळाडूंनी घरमालकाला बोलावले. घरमालकाने दरवाजा तोडला असता भावना आतमध्ये बेशुद्धावस्थेत आढळली. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एका उभरत्या खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला

घटनेची माहिती मिळताच खरखौदा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यूपीत राहत असलेल्या भावनाच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबीय सोनीपतमध्ये पोहोचताच शवविच्छेदनानंतर भावनाचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपासात डोक्यातील नस फाटल्याने भावनाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तथापि मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. (Suspicious death of UP female boxer in Sonipat)

इतर बातम्या

Coimbatore | प्राध्यापकाकडून लैंगिक अत्याचार, कारवाईत चालढकल, हताश झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

VIDEO : अहमदनगरमध्ये चोरट्यांची हिम्मत वाढली, बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपये लुटले, थरार सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.