AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साधूच्या वेषात आली अन् मेड इन पाकिस्तान पंखा देऊन गेली… कोण होती रहस्यमयी महिला?; तपास यंत्रणांकडून शोध

मथुरामधील गोवर्धन परिसरात साधूच्या वेषात एका महिलेने दुरुस्तीसाठी आणलेल्या पंख्यावर 'मेड इन पाकिस्तान' लिहिलेले असल्याने खळबळ उडाली आहे. दुकानदाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी बांगलादेशी नागरिकांच्या संभाव्य संलग्नतेचा दावा केला आहे.

साधूच्या वेषात आली अन् मेड इन पाकिस्तान पंखा देऊन गेली... कोण होती रहस्यमयी महिला?; तपास यंत्रणांकडून शोध
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2025 | 5:14 PM
Share

उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पंखा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक महिला साधूच्या वेषात पंखा दुरुस्त करण्यासाठी घेऊन आली होती. दुकानदाराने पंख्यावर ‘Made in Pakistan’ लिहिलेलं पाहिलं आणि पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली असून या साधूच्या वेषातील महिलेचा शोध घेत आहेत. स्थानिकांनी तर या परिसरात बांगलादेशी नागरिक लपलेली असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या बांगलादेशी नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या महिलेचा शोध सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल , असं एसपी सुरेश चंद्र रावत यांनी सांगितलं.

मथुराच्या गोवर्धन परिसरातील ही घटना आहे. एक महिला साधूच्या वेषात आली होती. ही महिला पंखा दुरुस्तीसाठी घेऊन आली होती. पंखा खराब झाल्याने तिने हा पंखा दुकानदाराला दुरुस्तीसाठी दिला. दुकानदाराने पंखा ठेवून घेतला. जेव्हा दुरुस्त करायला सुरुवात केली तेव्हा त्यावर ‘Made in Pakistan’ असे शब्द लिहिले होते. हे शब्द पाहून तो दचकला. त्याने लगेच या पंख्याचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाचा: मी तुझ्या बायकोसोबत आहे; नवऱ्यानं रंगेहाथ पकडूनही ती थांबली नाही… नेमकं काय घडलं?

अनेकांची चौकशी

पोलिसांनी आधी या दुकानदाराची चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. ही महिला पंखा घेऊन आली. त्यावर मेड इन पाकिस्तान लिहिलेलं होतं, असं त्याने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांना या महिलेचा काहीच सुगावा लागलेला नाही. पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील अनेक लोकांकडे या रहस्यमयी महिलेची चौकशी केली. पण अद्याप कुणालाच तिचा थांगपत्ता सांगता आलेला नाही. मथुराच्या गोवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधा कुंड चौकीच्या जवळील परिक्रमा मार्गावरील ही घटना आहे.

चौकशी सुरूच

दरम्यान, या सर्व घडामोडींवर स्थानिकांनी भाष्य केलं आहे. या परिसरात मोठ्या संख्येने बांगलादेशी लपलेले आहेत. या लोकांचे संबंध संशयास्पद हालचालींशी असू शकतात, असं या लोकांचं म्हणणं आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार या बांगलादेशींबाबत पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. पण पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. तर एसपी रावत यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पंखा अधिक जुना असू शकतो. चौकशीत गंभीर माहिती मिळाली तर कारवाई होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.