AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं

आमच्या गाडीला आग लागली. मी आणि भाऊ कसेबसे बाहेर पडलो, मात्र पतीचे प्राण आम्हाला वाचवता आले नाहीत आणि गाडीत त्यांचा जळून मृत्यू झाला, असा बनाव तिने रचला. ( Tamilnadu Wife Murders Husband )

तीन कोटींच्या विम्याची हाव, महिलेने पतीला कारमध्ये जिवंत जाळलं
तामिळनाडूत पत्नीकडून पतीची निर्घृण हत्या
| Updated on: Apr 11, 2021 | 7:42 AM
Share

चेन्नई : तामिळनाडूमध्ये पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन कोटींचा विमा मिळवण्यासाठी पत्नीने आपल्या चुलत भावाच्या मदतीने पतीची हत्या केली. पतीचा मृत्यू हा कारचे जळीतकांड असल्याचा बनाव तिने रचला. विशेष म्हणजे कर्ज चुकवण्यासाठी माझी हत्या कर आणि विम्याचे पैसे मिळव, अशी योजना खुद्द पतीनेच आखली होती, असा दावाही तिने केला आहे. (Tamilnadu Wife Jyoti Mani Murders Husband Rangrajan by setting Car on Fire to get Insurance)

तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातील पेरुन्दुरई गावात राहणाऱ्या 62 वर्षीय रंगराजन यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाला. रंगराजन हे पॉवरलूम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होते. काही दिवसांपूर्वी ते एका अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर कोइम्बतूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

रुग्णालयातून घरी जाताना कार पेटल्याचा बनाव

उपचारांनंतर रंगराजन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांची 55 वर्षीय पत्नी ज्योती मणी आणि तिचा 41 वर्षीय चुलत भाऊ राजा यांनी डिस्चार्जनंतरच्या प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांना ओम्नी कारने घरी नेले जात होते. मात्र त्याआधीच त्यांनी रंगराजन यांच्या हत्येचा कट रचला होता. या गाडीतच जाळून ज्योती आणि राजा यांनी रंगराजनची हत्या केली.

दरम्यान, पेरुमानल्लूरजवळ आमच्या गाडीला आग लागली. मी आणि राजा गाडीतून कसेबसे बाहेर पडून जीव वाचवण्यात यशस्वी ठरलो, मात्र रंगराजन यांचे प्राण आम्हाला वाचवता आले नाहीत, आणि गाडीत त्यांचा जळून मृत्यू झाला, असा बनाव ज्योतीने रचला.

विम्याच्या हव्यासापायी कृत्य केल्याची कबुली

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा ज्योती आणि राजा यांचे जबाब परस्पर विरोधी आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी कसून चौकशी केली असता ज्योतीने विम्याच्या पैशांच्या हव्यासापायी हे कृत्य केल्याची कबुली दिली.

पती रंगराजन यांचा तीन कोटी रुपयांचा अपघात विमा काढला होता. त्यावर एक कोटी रुपयांचं कर्जही मिळवलं होतं. मात्र उधारी मागणाऱ्या व्यक्तींचा तगादा वाढू लागला. आपण विम्याचे नॉमिनी होतो, असा दावा ज्योतीने केला आहे.

पतीनेच प्लॅन आखल्याचा महिलेचा दावा

धक्कादायक म्हणजे कर्ज चुकवण्यासाठी माझी हत्या कर आणि विम्याचे पैसे मिळव, अशी योजना खुद्द रंगराजनने आखल्याचा दावा ज्योतीने केला आहे. त्यानुसार आपण राजाच्या साथीने गाडीवर पेट्रोल टाकून जाळल्याचंही तिने सांगितलं. या घटनेला अपघाताचं रुप देऊन विमा मिळवण्याचा आपला प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली बहीण-भावाला तुरुंगात पाठवलं आहे.

संबंधित बातम्या :

संशयाची सुई, त्यानं बायकोवर भर रस्त्यात चाकुचे सपासप वार केले, लोक काय करत होते?

अंबाजोगाईच्या ‘त्या’ कपलचं अमेरिकेत काय झालं?; नवऱ्यानेच बायकोला भोसकलं?

(Tamilnadu Wife Jyoti Mani Murders Husband Rangrajan by setting Car on Fire to get Insurance)

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.