काँग्रेस नेत्याने बायकोला कापलं, नंतर तंदूरमध्ये भाजलं, त्यावर तूप टाकलं आणि…, त्या रात्री नेमकं काय घडलेलं?
रहस्य 'त्या' रात्रीचं, ज्यामुळे उडालेली देशाची झोप... काँग्रेस नेत्याकडून बायकोची हत्या, आधी कापलं, तंदूरमध्ये भाजलं, मृतदेहावर तूप टाकलं आणि..., जाणून बसेल धक्का

रहस्य आहे एका काँग्रसच्या नेत्याचं… त्याने अत्यंत निर्दयीपणे बायकोला संपवलं… या घटनेबद्दल अनेकांना माहिती देखील असेल. 1995 मध्ये घडलेली ही घटना आजही थक्क करणारी आहे. दिल्ली येथील काँग्रेस युवा शाखेचा सदस्य सुशील शर्मा याने पक्षासाठी अथक परिश्रम केले. याच दरम्यान सुशील याची ओळख नयना साहनी हिच्यासोबत झाली. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नयानाने डीयूमधून शिक्षण पूर्ण केले आणि कमर्शियल पायलटचा परवाना मिळवला. सुशील शर्मा याला युवा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं.
दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु असताना असं काही घडलं ज्यामुळे काँग्रेस नेत्याने बायको नयना हिची हत्या केली. 3 जुलै 1995 मधील ती काळी रात्र… रात्रीचे 1 वाजले होते आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मॅक्सवेल परेरा यांचा फोन वाजवा आणि त्यांना सांगण्यात आलं की, अशोक यात्री निवास हॉटेलच्या तंदूरमध्ये एका मृतदेहाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
परेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नयना अत्यंत वाईट प्रकारे भाजली होती आणि तिचा मृतदेह हॉटेल मधील किचनच्या फर्शीवर पडलेला होता. एका कपड्यामध्ये नयना हिला झाकण्यात आलं होतं… पोलिसांनी बागिया रेस्टॉरंटचा मेनेजर केशव कुमार याला ताब्यात घेतलं होतं. नयनाचा मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाला होता.
जर मृतदेह अर्धा तास अधीक जळत राहीला असता तर सर्वकाही संपलं असतं आणि शोध घेणं देखील कठीण झालं असतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, नयना साहनीचं शरीर पेट घेत असताना, सुशील शर्मा याने बागियाचा मॅनेजर केशव याला तूप आणण्यासाठी पाठवलं.
तपास सरु असताना कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनचे एसएचओ निरंजन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नयना साहनी हिचा मृतहेद तंदूरमध्ये नाही तर, तंदूरवर ठेवून जाळण्यात आला… ‘ कॉन्स्टेबल कुंजू हे जळालेला मृतदेह पाहणारे पहिले व्यक्ती होते. ते त्या रात्री 11 वाजता जनपथवर गस्त घालत होते.
तेव्हा कुंजू यांना अशोक यात्री निवासच्या परिसरातून ज्वाळा आणि धूर निघताना दिसला. आग लागल्याचं पाहून ते बागिया रेस्टॉरंटच्या गेटजवळ पोहोचले आणि त्यांना सुशील शर्मा गेटला बॅरिकेड करत उभा असलेला दिसला. जेव्हा आगीचं कारण विचारलं तेव्हा, पार्टीने जुने पोस्टर जाळण्याचं काम सुरु आहे… असं कॉन्स्टेबल कुंजू यांना सांगण्यात आलं.
पण कॉन्स्टेबल कुंजू यांना विश्वास बसत नव्हता… अशात त्यांनी हॉटेलच्या मागच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आडवण्यात आलं… पण त्यांनी पाहिलं तेव्हा मृतदेह जळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर कॉन्स्टेबल कुंजू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला आणि घटनेची माहिती दिली.
काँग्रेस नेत्याने का केली बायकोची हत्या?
सुशील याला नयना हिच्यावर संशय होता. त्यामुळे त्याने गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर तिचं शरीर पॉलिथिनमध्ये पॅक केलं कापडात गुंडाळले, परंतु जेव्हा मृतदेह उचलू शकला नाही तेव्हा त्याने ते खोलीतून गाडीपर्यंत ओढत नेलं. नयना हिची हत्या केल्यानंतर, सुशील तिचा मृतदेह यमुनामध्ये फेकून देणार होता. पण नंतर त्याला वाटले की कोणीतरी तिला पाहू शकेल, म्हणून त्याने नैनाचा मृतदेह त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये जाळण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्टनुसार, सुशील शर्मा आणि नयना साहनी मंदिर मार्गावरील फ्लॅट 8 ए मध्ये पती-पत्नी म्हणून राहत होते, परंतु त्यांनी त्यांच्या लग्नाची माहिती सार्वजनिक केली नाही. नयाना, सुशीलवर सर्वांसमोर नातं स्वीकार कर असा दबाव टाकत होती. यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला होता. सुशील त्याच्या शिक्षेदरम्यान खूप बदलला आणि तो तुरुंगात पुजारी म्हणून काम करु लागला…
