मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक

चोराने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना हिसका दिला. त्यामुळे त्या धावत्या रेल्वेगाडीखाली फेकल्या गेल्या (Thane Lady Dies Local thief)

मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक
विद्या पाटील
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 11:20 AM

ठाणे : मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन 35 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. ठाणे लोहमार्ग पोलिसांना चोरट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आलं आहे. 31 वर्षीय आरोपी फैजल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. (Thane Lady Dies under Mumbai Local while chasing Mobile thief)

लोकलच्या महिला डब्यात चोराचा शिरकाव

राज्यात कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मुभा आहे. अशातच चोरट्याने लोकलमध्ये शिरुन महिलेचा जीव घेतल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या पाटील या अंधेरीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. शनिवारी सायंकाळी त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडली. त्यावेळी त्यांच्या महिला डब्यामध्ये केवळ पाच ते सहा महिला प्रवासी होत्या. लोकल कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एक चोरटा डब्यात शिरला.

चोरासोबत झटापटीत लोकलखाली पडून मृत्यू

चोराने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना हिसका दिला. त्यामुळे त्या धावत्या रेल्वेगाडीखाली फेकल्या गेल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 7:15 वाजता कळवा रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

सराईत गुन्हेगाराला अटक

या घटनेप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 31 वर्षीय आरोपी फैजल शेख हा मुंब्रा येथे राहत असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने मुंब्रा येथील बाँबे कॉलनीतून फैजल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

लोकलमध्ये मंत्रालय कर्मचाऱ्यावर महिलेसह चौघांचा हल्ला, प्रवाशानेच बहादुरीने एकाला पकडले

VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

(Thane Lady Dies under Mumbai Local while chasing Mobile thief)

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.