नंबर प्लेटला पिवळा रंग फासून रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात चोरी झाली होती. त्या दुकानातून महागड्या वायर चोरीला गेल्या होत्या.

नंबर प्लेटला पिवळा रंग फासून रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर, एक लाखाचा मुद्देमाल जप्त
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 4:33 PM

कल्याण : नंबर प्लेटवर पिवळा रंग फासून रात्रीच्या वेळी दरोडे टाकणाऱ्या चोरांच्या टोळीला (Thief Arrested By Kalyan Police) जेरबंद करण्यात कल्याण पोलिसांना यश आलं आहे. कल्याण परिसरात नंबर प्लेटवर पिवळा रंग फासलेली रिक्षा फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही रिक्षा आणि रिक्षा चालकासह प्रवाशांना ताब्यात घेतलं. मात्र, तपासादरम्यान रिक्षा चालविणारा तसेच रिक्षातून प्रवासी म्हणून फिरणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क चोरटे आहेत हे उघड झालं. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक करुन पुढील सुरु केला आहे (Thief Arrested By Kalyan Police).

कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात चोरी झाली होती. त्या दुकानातून महागड्या वायर चोरीला गेल्या होत्या. स्टेशन परिसराला लागून असलेल्या या मार्केटमध्ये रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बानकर यांनी या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांना सोपवला. काही दिवसांनी एका माहितीदाराने पोलिसांना माहिती दिली की रात्रीच्या वेळी एक रिक्षा फिरते. तिच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग फासला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध सुरु केला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. रिक्षा चालकासह रिक्षात प्रवासी म्हणून बसणारे दुसरे कोणी नाही तर चोर होते. रात्रीच्या वेळी ते चोरीचं काम करत होते. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजीत बहिरे आणि एक अल्पवयीन तरुणालाही ताब्यात घेतलं आहे (Thief Arrested By Kalyan Police).

अल्पवयीन चोरट्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तर अन्य तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे याच चार जणांनी मिळून ग्राइंडर मशिनच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 1 लाख 10 हजार लाखाचा चोरी गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Thief Arrested By Kalyan Police

संबंधित बातम्या :

बीडमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न, संतप्त शेतकऱ्यांचा वाळू माफियांना घेराव

लातुरात एक कोटीच्या विम्यासाठी मजुराची हत्या, आठ वर्षांनंतर पत्नीला अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.