देशातली शेकडो हॉटेल्समध्ये चोरी, सुटाबुटात वावरणाऱ्या महाठकास बेड्या

महागडे कपडे घालून हॉटेल्सना लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Thief arrested navi mumbai)

देशातली शेकडो हॉटेल्समध्ये चोरी, सुटाबुटात वावरणाऱ्या महाठकास बेड्या
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:55 AM

नवी मुंबई : महागडे कपडे घालून हॉटेल्सना लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉनिल झोन असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण 187 हॉटेल्सना लुटलेले आहे. सध्या हा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात आहे. (Thief who has looted lots of hotels have been arrested in navi mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, स्व:तच्या कंपनीचे प्रेझेंटेशन असल्याचे सांगत आरोपी डॉनिल झोन वाशी येथील तुंगा हॉटेलमध्ये आला. 14  डिसेंबर रोजी कंपनीचे महत्त्वाचे प्रेझेंटेशन असल्याचे त्याने हॉटेल मालकाला सांगितले. त्यासाठी त्याने हॉटेल प्रशासनाकडून एक महागडा लॅपटॉप आणि महागडी दारुही मागवून घेतली. सोबत चांगल्या जेवणाची व्यवस्था करण्याचेही त्याने सांगितले. त्याने सांगितल्यानुसार तुंगा हॉटेलच्या प्रशासनाने सर्व तयारी केली. मात्र, ऐनवेळी आरोपी डॉनिल झोन याने हॉटेलमधून पळ काढला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेलच्या मालकाने पोलिसात धाव घेतली.

सीसीटीव्हीच्या साहाय्याने बेड्या

आपली लूट झाल्याचे लक्षात येताच तुंगा हॉटेलच्या मालकाने वाशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही तत्काळ तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे शोध घेत पोलिसांनी आरोपीला घोडबंदर येथून ताब्यात घेतले. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आतापर्यंत 187 हॉटेल्सची लूट केल्याचे समोर आहे. सुटाबुटात जाऊन हॉटेल्समधील महागडे सामान घेऊन तो पसार व्हायचा. आतापर्यंत त्याने लाखो रुपयांचे सामान लुटल्याचे तपसात समोर आले आहे.

पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे आणि सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरट्याचा शोध घेण्यात आला. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमान यांच्या पथकाने चोराला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले आहे की नवी मुंबई ते ठाणे या परिसरात अशी फसवणूक होऊ शकते. हॉटेलमध्ये रुम देताना KYC आणि पॅनकार्डची चौकशी कुरुनच रुम द्या, असे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :
(Thief who has looted lots of hotels have been arrested in navi mumbai)
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.