Dombivali Loot : डोंबिवलीत मोबाईल चोराची दहशत, भर रस्त्यात हॉटेल मॅनेजरवर चाकूने हल्ला करुन मोबाईल काढून पोबारा

चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात राधेश्याम गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Dombivali Loot : डोंबिवलीत मोबाईल चोराची दहशत, भर रस्त्यात हॉटेल मॅनेजरवर चाकूने हल्ला करुन मोबाईल काढून पोबारा
डोंबिवलीत भर रस्त्यात हॉटेल मॅनेजरवर चाकूने हल्ला करुन मोबाईल काढून पोबारा
Image Credit source: TV9
सुनील जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 19, 2022 | 1:15 AM

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता रस्त्यावर येजा करणाऱ्या प्रवाशांनाही थांबवून त्यांच्यावर चाकूचा हल्ला (Knife Attack) करत लुटण्याची घटना डोंबिवली घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशीच एक घटना रविवारी रात्री घडली आहे. कामावरुन घरी परतणाऱ्या हॉटेल मॅनेजरवर हल्ला करुन त्याचा मोबाईल (Mobile) लुटून चोरट्यांनी पोबारा केला. राधेश्याम सिंग असे लुटण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात राधेश्याम गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी भर रस्त्यात ये जा करणाऱ्य प्रवाशांची अशाप्रकारे लूट होत असल्याने डोंबिवली परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस ग्रस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी

डोंबिवली कोळेगाव येथे राहणारे राधेश्याम सिंग हे काटई बदलापूर पाईपलाईन रोडवरील समाधान हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. रविवारी रात्री 12.30 च्या दरम्यान ते हॉटेल बंद केल्यानंतर दुचाकीवरुन आपल्या घरी जात होते. कोळेगावातील गणपती कारखान्याजवळ त्यांची गाडी येताच बदलापूर दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. राधेश्याम यांची गाडी अडवताच त्यातील एका इसमाने धारदार चाकू राधेश्याम यांच्या पोटात खुपसला. त्यांना गंभीर जखमी करत त्यांच्याकडील महागडा मोबाईल काढून हल्लेखोरांनी पोबारा केला. या घटनेत राधेश्याम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. (Thieves attacked hotel manager with knife and stole mobile phone in Dombivali)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें