दागिने पाहण्याचा बहाणा करत सराफाला लुटले, पळून जाण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांकडून गोळीबार

दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले. दागिने पाहत पाहता 15 तोळे सोने लुटले. मात्र नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी गोळीबार केला.

दागिने पाहण्याचा बहाणा करत सराफाला लुटले, पळून जाण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांकडून गोळीबार
बारामतीत ज्वेलर्स दुकानात लूटImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 10:00 AM

बारामती / नविद पठाण : दागिने पहाण्याचा बहाणा करत सराफाला लुटल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे घडली आहे. दागिने लुटून दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गोंधळ उडाल्याने आरोपींनी गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून, एकावर साळुंके हॉस्पिटमध्ये उपचार चालू आहेत. मात्र एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले आहे, तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पवन विश्वकर्मा असे अटक आरोपीचे, तर सागर दत्तात्रय चांदगुडे, अशोक भागुजी बोरकर, सुशांत क्षिरसागर अशी पळून गेलेल्या तिघांची नावे आहेत.

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले अन् दागिने लुटले

बारामती तालुक्यातील सुपे येथील बाजार मैदानानजीक सुयश सुनिल जाधव यांचे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात चार जण आले. त्यांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाणा केला. यावेळी दागिने पाहण्याचा बहाणा करुन चौघांनी दुकानातील 15 तोळे सोने लुटले. सोने पळवण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी दुकानात गोळी झाडली.

दरोडेखोरांच्या गोळीबारात तीन जण जखमी

दुकानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना बाहेर उभे असलेल्या सागर चांदागुडे यांनी दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोराने गोळी झाडली. यात चांदागुडे जखमी झाले. अशोक बोरकर यांच्या पोटाला दोन गोळ्या चाटून गेल्या, तर सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला गोळी लागली. घटनेची माहिती सुपे पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस नाईक दत्तात्रय धुमाळ, नाजीर रहीम शेख, राजकुमार लव्हे हे घटानस्थळी दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

एकाला पकडण्यात यश, तिघे फरार

पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले, तर तीन जण चारचाकी गाडीतून फरार झाले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरिक्षक सलीम शेख करीत आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.