सांगोल्यात भीषण अपघात, ओमनी चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, 9 जखमी

सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सांगोल्यात भीषण अपघात, ओमनी चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, 9 जखमी
सांगोल्यात भीषण अपघात

सांगोला (सोलापूर) : सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालट्रक आणि प्रवासी ओमनी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओमनीतील 9 जण जखमी

सांगोला मिरज रस्त्यावर कारंडेवाडी फाट्याजवळ मालट्रक आणि ओमनी अपघातामध्ये ओमनी ड्रायव्हरसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर ओमनीतील 9 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत ओमनीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

चालकासह दोन चिमुकलींचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील ओमनी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे उदनवाडी येथून 12 प्रवाशांना घेऊन  कर्नाटकच्या सिंदगी येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निघाले होते. या दरम्यान कारंडेवाडी फाट्याजवळ ओमनी आणि मालट्रक दोघांमध्ये समोरासमोर अपघात झाला. यामध्ये ओमनी चालक आणि त्यांच्या शेजारी असणारी  कावेरी मनोज हरिजन (वय 7) गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8) या दोघींचा मृत्यू झाला. तर ओमनी मधील 9 जण जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : दुर्गंध कुठून येतोय, घरातून येतोय? सोसायटीतील रहिवाशांनी माजी नगरसेवकाला बोलावलं, दरवाजा तोडला तर धक्कादायक प्रकार उघड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI