Twitter : ट्विटर इंडिया पुन्हा अडचणीत; संसदीय समितीने बजावले समन्स

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Aug 25, 2022 | 1:11 AM

माहिती तंत्रज्ञानासंबंधी संसदीय समितीने डाटा सुरक्षा व नागरिकांच्या गोपनीयतेच्या मुद्द्यावर ट्विटर इंडियाला समन्स बजावले आहे. या समन्सनुसार ट्विटर इंडियाच्या अधिकार्‍यांना 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता संसदीय समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

Twitter : ट्विटर इंडिया पुन्हा अडचणीत; संसदीय समितीने बजावले समन्स
ट्विटर
Image Credit source: social

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या कठोर भूमिकेमुळे ट्विटर इंडिया (Twitter India) पुन्हा अडचणींत सापडले आहे. डाटा सुरक्षेच्या मुद्द्यावरून माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसदीय समिती (Parliamentary Committee)ने ट्विटर इंडियाला समन्स (Summons) बजावले आहे. समितीने शुक्रवारी, 26 ऑगस्टला ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाण्याची सूचना केली आहे. या समन्समुळे ट्विटर इंडियाचे धाबे दणाणले आहेत. केंद्र सरकार ट्विटरविरोधात पुन्हा कारवाईचा बडगा उगारू शकते, अशी चिन्हे आहेत. याच समन्सआधी ट्विटरच्या वरिष्ठ अधिकार्‍याने मोदी सरकारवर विविध गंभीर आरोप केले आहेत. त्याचदरम्यान संसदीय समितीने समन्स बजावले आहे. त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा सामना पुन्हा रंगण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत.

गोपनीयतेच्या मुद्द्यावर ट्विटर इंडियाला समन्स बजावले

माहिती तंत्रज्ञानासंबंधी संसदीय समितीने डाटा सुरक्षा व नागरिकांच्या गोपनीयतेच्या मुद्द्यावर ट्विटर इंडियाला समन्स बजावले आहे. या समन्सनुसार ट्विटर इंडियाच्या अधिकार्‍यांना 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता संसदीय समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने ट्विटर इंडियाला समन्स बजावण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या 10 कोटींहून अधिक युजर्सच्या डाटाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून संसदीय स्थायी समितीमध्ये सुरू आहे. या अनुषंगाने आयआरसीटीच्या अधिकार्‍यांनाही समितीपुढे हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

काँग्रेस खासदार थरूर यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समिती टेक कंपन्या, सोशल मीडिया कंपन्या, मंत्रालये आणि नागरिकांच्या गोपनीयतेच्या मुद्द्यावर विविध भागधारकांसह बैठका घेत आहे. ही समिता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांचीही चौकशी करणार आहे. (Twitter India in trouble again; Summons issued by the Parliamentary Committee)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI