AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोणाला टाकून पैसे जमा करू लागले तुम्ही’ Viral झालेल्या Call Recordingमधील पोलिसांचं संपूर्ण संभाषण

Viral Audio Clip of Shrirampur Police : यातील एक क्लिप 1 मिनिट 54 सेकंदाची आहे, तर दुसरी क्लिप 3 मिनिट 4 सेकंदांची आहे. या दोन्ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'कोणाला टाकून पैसे जमा करू लागले तुम्ही' Viral झालेल्या Call Recordingमधील पोलिसांचं संपूर्ण संभाषण
वसुलीवरुन सुरु असलेल्या पोलिसांच्या संभाषणचं कॉल रेकॉडिंग व्हायरल!
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 5:16 PM
Share

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका (Shrirampur, Ahamadnagar Distict) पोलिस ठाण्यातील पोलिसांची अवैध धंदेवाल्यांकडून वसुलीबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral Audio Clip of Police) झाली आहे. यामध्ये संबंधित पोलिस अधिकारी तसेच तीन पोलिस कर्मचारी यांच्यात हमरीतुमरी झाली. यावेळी एकानं दुसऱ्याला शिवीगाळही केल्याचं ऐकू येतंय. ही ऑडिओ क्लिप संपूर्ण नगर जिल्ह्यात व्हायरल झाली असून या क्लिपमुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता नेमकी कुणावर आणि काय कारवाई होते, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. वसुलीवर एका पोलिस कर्मचाऱ्यानं दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केल्याचं स्पष्टपणे ऐकू येतंय. या क्लिमध्ये पोलिसांच्या वसुलीचा काळा चेहरा समोर आला असल्याचं बोललं जातंय. श्रीरापूर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचं आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल यांच्यात हा संवाद (Telephonic Conversation) झाल्याचा दावा केला जातो आहे.

नेमकी काय चर्चा झाली?

श्रीरामपूर तालुक्यात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल राऊत यांच्या संभाषण झालं होतं. या संभाषणात पोलिसांच्या वसुलीवरुन पोलीस निरीक्षक हेड कॉन्स्टेबलला सुनावत असल्याचं स्पष्टपणे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू आलं आहे. तर दुसरीकडे पोलिस हेडकॉन्स्टेबल यांनीही आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दिसून आलं आहे. याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप समोर आल्या असून त्यातील दोन्ही ऑडिओ क्लिपमधील संभाषण खालीलप्रमाणे करण्यात आलं होतं.

ऑडीओ क्लिप मधिल संभाषणातील शब्द जसाच्या तसा…

पीआय साळवे – राऊत कुठे आहे तुम्ही ? राऊत – साहेब घरी होतो.

पीआय साळवे – कोणाला टाकून पैसे जमा करू लागले तुम्ही पुन्हा.. राऊत – नाही नाही कोणाकडे नाही हे साहेब

पीआय – आरे ते … राऊत – माझ्या , माझ्या पोरिचा काल बर्थडे झाला तीची शपथ घेऊन सांगतो कोणाकडेच गोळा करायला जात नाही..बस्स विनंतीवरून

पीआय – कायावरून ? राऊत – वैरागळने सांगितले ना …तुम्ही कोणाकडेच जावु नका म्हणी

पीआय – बरोबर आहे ना मग, तुम्हाला ते कामच दिलेले नाही तर तुम्ही कशाला जाता तिकडं राऊत – ठीक आहे साहेब, नाही जात

पीआय – कोणाकडेच जायचे नाही, नाहीतर उगच उलट, रिकामं हे नका करू काही तरी राऊत – पन वैरागळला जायला नका लावू साहेब , विनंतीवरून …

पीआय साळवे – आरे वैरागळ जाईल हो, त्याच्याकडे कलेक्शनचे काम दिलेले आहे. तो जाईन ना तुम्ही कोण त्याला सांगणारे राऊत – ठीक हे ठीक हे

पीआय साळवे – तुम्ही सांगणारे कोण हे राऊत – नाही नाही साहेब.. बरं का.. ऐका मला त्याचा राग नाही साहेब

पीआय साळवे – तुम्ही या बर समक्ष तुम्हाला दाखवतो काय आहे ते …काही उगच (शिवा देत) सारखे काम नका करू जा… राऊत – ऐका ना साहेब , त्याचा राग नाही माझे आई-बाप काढू राहीला , म्हणजे त्याची लायकी आहे का माझ्या पुढं…

पीआय – आरे , तुमची लायकी आहे का त्याची लायकी आहे , तुम्ही मला सांगणारे कोण ? त्याला नका देवु अन याला नका देऊ.. राऊत – नाही नाही द्या ना साहेब मला काही अडचण नाही पण माझ्या आईला कशाला त्याने आई बाई केल ?

पीआय साळवे – अहो, तुम्ही तुमचं वैयक्तिक मँटर मिटवा, राऊत तुमच्या डोक्यात येतंय का काही… तुमचं काय आहे तिकडं एकमेकांच्या (शिवी देत) बसा राऊत – हूं , हूं , हू

पीआय साळवे -(शिवी देत) बसा तिकडं , (शिवी देत) घाला , मला कशाला मधी घेता त्याच्यात राऊत – अहो साहेब त्याला कळायला पाहिजे नी, बोलायची पद्धत पाहिजे ना त्याला

पीआय – तुम्ही तुमचं मँटर काय आहे ते करा, नाही तर तसा रिपोर्ट द्या मला शिवीगाळ देताना मी पाठवतो वरिष्ठांना राऊत – मी जाणारच आहे साहेबांकडे , मी जाणारच आहे एसपी साहेबांकडे १०० टक्के ….मी एसपी साहेबांना डायरेक्ट रिपोर्टींग करणार आहे की , अस अस सांगितल साहेब.

पीआय साळवे – राऊत , तुम्हाला मी सांगतो ना राऊत – अहो साहेब, मी काय म्हणतो ऐका ना माझ्या राशीत नाही हो दादा…बरं का साहेब माझ्या राशीत नाही ते वाटोळं करायच कोणाच

पीआय साळवे – ठिक हे ठिक हे , तुम्ही या मला समक्ष भेटा , सांगतो राऊत – नाही हो साहेब त्यांनी घरच्याला कशाला , कशाला बोलायचे मग ?

दरम्यान, यासोबतच पोलिस हेड कॉन्स्टेबल राऊत आणि पोलिस कॉन्स्टेबल वैरागळ यांच्यातील संभाषणही समोर आलं आहे. याचीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून दोन्ही ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या ऑडिओ क्लिमध्ये नेमकं काय संभाषण झालं, ते ही जाणून घ्या…

पोलिस हेडकॉन्स्टेबल राऊत आणि पोलिस कॉन्स्टेबल वैरागळ यांच्यातील संभाषण

राऊत – माझी ***** कुठे ***** घातली म्हणाला तू .. वैरागळ – काय झालं?

राऊत – तू म्हणाला ना माझी ***** कुठे ***** होती. आमचे आई बाप वा-यावर पडले नाही, वैरागळ दादा तूच म्हटला होता तुझी ***** कुठे ***** घातली होती म्हणून .. वैरागळ – तू हिशोबात रहा.. योग्या तुला आणखी सांगतो मी बरकां… तुझ्यामुळे लोक मला फोन करू राहिलेत…

राऊत – कढ गेलतो मी लोकं फोन करू राहीलेत, कोणते लोक फोन करू राहीलेत तुला …तुझ्या ***** दम आहे का रेड मारायाची, मी मारून ‌दाखवतो. वैरागळ – काय झालं?

राऊत – रेड मारायची दानत आहे का तुझ्यात ? वैरागळ – तू हे बघ, तू कुठेच जावू नकोस, तुला सांगतो मी ..

राऊत – अँ‌… वैरागळ – चहा – पाण्याला देत जाईल तू कुठच जावू नको…

राऊत – चहा – पाणीच म्हणतो ना, दे ना पण काहीतरी.. तेच म्हणतोय ना … वैरागळ – आं…

राऊत – दे ना चहा-पाणी.. दे ना..मग काहीच अडचण नाही … वैरागळ – कोर्सवरून येऊस्तर दम नाही. थोडा दम काढीत जा ना काही गोष्टींचा ..

राऊत – आरे तू आला होता म्हणून गेलो होतो मी, तुला फोन केला होता दादा …असं असं झालं म्हणून वैरागळ – हा बरोबर आहे हे पण परत लोकांचे फोन आले

राऊत – कोणत्या लोकांचे फोन आले सांग ना, मी जातो ना.. वैरागळ – तुला मागच्या वेळेस काय सांगितल हे असं असं करायचं आहे… त्याच्यात काय होतयं चार लोक देतात , दहा लोक देत नाहीत…

राऊत – हूं हू .. वैरागळ – आलं का लक्षात

राऊत – ऐक ना ..लई हे रे लई हे …वैरागळ दादा वैरागळ – आं…

राऊत – लई हे,नलई हे आपल्याकडं लई हे वैरागळ – आरे कितीही असू दे बाबा …

राऊत – लई हे आपल्याकडं, लोकांना म्हणून नाही सांगत तुला. मला कुठेही जावू दे आपला असाच स्वभाव हे भाई वैरागळ – आम्हाला नको सांगू तू तुझा स्वभाव आलं का लक्षात ? पण तुझ्यामुळं मी अडचणीत आलो ना… मग ते वेगळं होवून जाईन. राऊत – अं… वैरागळ – तू जी…करतो ते मला निस्ताराव लागतयं राऊत – आरे कोणीच माझ्या नावाने ओरडत नाही राव… ते महत्वाचं आहे. श्रीरामपुर मध्ये कोणीच नाही… वैरागळ – काही गोष्टी समजून घेत जाय तू

राऊत – आरे काय‌ समजून घेऊ तुला ज्या वेळेस फोन केला तू फोन उचलित नाही टायमावर… तुझी तीच गुरमीत हे गो-या त्या वेळेस फोन उचलीत नाही वैरागळ – तू पण कुठच नको जाऊ नको तुला सांगतो मी …कुठच जावू नको

राऊत – मला काय देणघेण, मी असा एडा अन्ना… हे मी कुठं जात असतो मग वैरागळ – चाललं ठेवू का ? राऊत – व्हय वैरागळ – बोल ना … राऊत – तुमचा श्रीरामपुरमधी शिक्का पडेल हे वैरागळ – कोणाचा ? राऊत – ब-याच ओळखी आहे तुमच्या वैरागळ – तुमच्या एवढया नाहीत ओळखी आमच्या, बरोबर ….तुम्ही प्रॉपर लोकहेत ना …

राऊत – प्रॉपरचा काय संबंध हे इथं … वैरागळ – आहे ना आहे ना… राऊत – आहे की नाही …मी काय म्हणून (शिवी देत) मारतो , पब्लिकला काहीतरी द्यायला पाहिजे ना? बाकीच जाऊ दे आपल काही का असेना…

वैरागळ – आरे भाऊ आपल्या पेक्षा 10 पटीने पब्लिक हे… राऊत – शार्प हे का ? मग आपल्याकडं आल्यावर कचक्या बसतो की नाही… वैरागळ – आपल्याकडे आल्यानंतरचा विषय हे.. पण आपल्यापेक्षा लोकांना दोन कायदे माहीत आहेत.

राऊत – कोणते दोन का‌यदे माहीत हे…होऊन होऊन काय होणारए वैरागळ – काय होणारए? … राऊत – काय होणारए? कोणत वासरू कोणत्या गाईला पीतं हे तुला माहीत हे का ? हे मला माहीती हे …आख्या नगर जिल्हयात हां … वैरागळ – हा हा हा … राऊत – आलं का ध्यानात … वैरागळ – बर बर राऊत – ठेवू का? वैरागळ – हा …

यातील एक क्लिप 1 मिनीट 54 सेकंदाची आहे, तर दुसरी क्लिप 3 मिनिट 4 सेकंदांची आहे. या दोन्ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी नेमकी आता काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

आधी गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावले अन… ; पुणे पोलिसांनी उघड केले धक्कादायक वास्तव

प्रियकराने प्रेयसीला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या; तिची मात्र पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली 18 महिन्यांची शिक्षा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.