ट्रेनमध्ये गाणाऱ्या मुलींवरुन रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांची तुफान हाणामारी; ब्लेडने सपासप वार, एकजण जखमी

Kasara fight | हे दोन्ही गर्दुल्ले ट्रेनमध्ये गुटखा विकणे, पाकीटमारी करायचे. रेल्वेत गाणाऱ्या दोन मुलींवरुन हे भांडण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या दोन्ही मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. या चौकशीतून आता पुढील माहिती समोर येईल.

ट्रेनमध्ये गाणाऱ्या मुलींवरुन रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांची तुफान हाणामारी; ब्लेडने सपासप वार, एकजण जखमी
कसारा रेल्वे पोलीस
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 7:28 AM

कल्याण: मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात दोन गर्दुल्ल्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कसारा रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये स्थानकात उभी होती. तेव्हाच या दोन्ही गर्दुल्ल्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. त्यावेळी एकाने स्वत:जवळ असलेल्या ब्लेडने दुसऱ्यावर वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गर्दुल्ल्याची ओळख पटली असून त्याचे नाव सोनू असे आहे. सोनूच्या गळ्यावर आणि छातीवर ब्लेडचे वार झाले आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

ट्रेनमध्ये गाणाऱ्या मुलींवरुन भांडण?

रेल्वे संघटनेच्या माहितीनुसार, हे दोन्ही गर्दुल्ले ट्रेनमध्ये गुटखा विकणे, पाकीटमारी करायचे. रेल्वेत गाणाऱ्या दोन मुलींवरुन हे भांडण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या दोन्ही मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. या चौकशीतून आता पुढील माहिती समोर येईल.

विरारमध्ये पाकीट पळवणाऱ्या चोरट्याकडून तरुणाची हत्या

विरारमध्ये चोरट्याने 30 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. पाकीट हिसकावून पळणाऱ्या चोराचा पाठलाग करुन पकडले असता चोरट्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात जबरी चोरी, हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. हत्या करणारा चोरटा हा सराईत असून त्याच्यावर रेल्वेत चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

30 वर्षीय हर्षल वैद्य विलेपार्ले भागात राहणारा असून नवरात्री निमित्त तो विरारमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तो परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला, तेव्हा एका सराईत चोरट्याने त्याचं पाकीट हिसकावून पळ काढला. हर्षलने चोरट्याचा पाठलाग करुन विरार पश्चिम स्टेशन जवळील श्रेया हॉटेलच्या गल्लीत त्याला पकडले. यावेळी चोर आणि हर्षल वैद्य यांच्यात झटापट झाली. याच झटापटीत चोरट्याने आपल्याजवळील धारदार हत्याराने हर्षलच्या छातीत वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी तात्काळ त्याला बाजूच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले, तर चोरट्यालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विरार पोलिसांनी यात हत्या, जबरी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या: 

पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध, पत्नीला राग अनावर; आधी गोळी मारली मग शरीराचे केले तुकडे

अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार, आता आई म्हणते माझ्यासोबतही अपहरण करुन लग्न

दसऱ्याच्या दिवशी लेकीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारच्या धडकेत मृत्यू; दुचाकी जळून खाक, मेहुणा गंभीर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.