AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime : उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना

21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला. बुधवारी एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली. तसेच दुसऱ्या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा शौचासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात आढळून आला.

UP Crime : उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 9:05 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधाम सुरु झाली आहे. त्यादरम्यान महिला सशक्तीकरणाचे दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का देणाऱ्या घटना घडतच आहेत. हरदोई जिल्ह्यात मागील 24 तासांत दोन मुलींच्या हत्या झाल्याने या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. यापैकी एक घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेमक्या घटना काय आणि कुठे घडल्या?

21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला. बुधवारी एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली. तसेच दुसऱ्या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा शौचासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात आढळून आला. तिची गळा आवळून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. या दोन हत्यांमुळे जिल्ह्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करीत आहेत.

24 तासांत दोन हत्या झाल्याने खळबळ

बुधवारी रात्री 7.30 च्या सुमारास हरपालपूरच्या काकरा गावात 21 वर्षीय तरुणी शेतात शौच करण्यासाठी गेली होती. तिथे तिला तिच्या प्रियकराने गाठले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून लोक धावले. मात्र आरोपी प्रियकराने तेथून पळून गेला. मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पूर्ववैमनस्यातून मुलीची हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरच पकडले जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

शेतात आढळले मुलींचे मृतदेह

दुसऱ्या प्रकरणात बुधवारी सायंकाळी घरातून शौचासाठी बाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा अकराच्या सुमारास मोहरीच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. शौचास गेलेली तरुणी बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तिचा मृतदेह शेतात पडलेला आढळला. या मुलीची हत्या गळा आवळून केली गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरोपींना लवकरच जेरबंद करू – पोलीस

लागोपाठ दोन मुलींच्या हत्या झाल्यामुळे जिल्हा पोलिसांची झोप उडाली आहे. हरदोईचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी, दोन्ही हत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात असून आम्ही लवकरच योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू, आरोपींना लवकरच तुरुंगात टाकले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Two girls killed in 24 hours in Uttar Pradesh)

इतर बातम्या

धक्कादायक ! पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा

Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.