पहाटे भाऊच्या धक्क्याला मासे आणायला गेले होते, कार दुभाजकावर आदळली, दोन ठार, चार जखमी
या वाहने हळू चालविण्याचे आवाहन करुनही चालक पहाटे गार वाऱ्यात बेफाम गाडी चालवत होता अशी माहीती अपघातात जखमी झालेल्यांनी दिली आहे.

एका भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारच्या चालकाचे नियंत्रण चुकाल्याने ही कार दुभाजकाला चार जण गंभीर जखमी झाले असून त्यातील दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना ईस्टर्न फ्रीवेवर साेमवारी पहाटे घडली. ऑरेंज गेट रॅम्पच्या उतारावर या पांढऱ्या इको कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेत विनोद रामा वायडे (५२) आणि अनिता रामजी जयस्वार (६०) या दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खुशबू रामनयन राजभर (२१) या पेशाने शिक्षिका असलेल्या तरुणी आणि तिची आई गीता राजभर, शेजारी विनोद वायडे, अनिता जयस्वार, सुलेखा वायडे आणि ड्रायव्हर चेतन नंदू पाटील यांच्यासह पहाटे ४.०० वाजता कळवा येथील वाघोबा नगर येथून मुंबईतील भाऊचा धक्का येथून मासे खरेदी करण्यासाठी निघाले होते.
गाडी हळू चालवण्याची विनंती करूनही दुर्लक्ष
वारंवार गाडी हळू चालवण्याची विनंती करूनही चालक चेतन पाटील हा ईस्टर्न फ्रीवेवर वेगाने गाडी चालवत होता. वेग जास्त असल्याने ऑरेंज गेट रॅम्पजवळ त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी डीवायडरवर आदळली. या धडकेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि खुशबू, तिची आई आणि चालकासह इतर जण जखमी झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
