डोंबिवलीच्या घटनेनंतर धुळ्यात बलात्काराची धक्कादायक घटना, पीडितेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत तब्बल 15 वर्ष बलात्कार

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सलग आठ महिने अत्याचार झाल्याची बातमी समोर आली होती. तर धुळ्यात एका विवाहितेवर दोन नराधमांनी तब्बल 15 वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डोंबिवलीच्या घटनेनंतर धुळ्यात बलात्काराची धक्कादायक घटना, पीडितेला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत तब्बल 15 वर्ष बलात्कार
एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Oct 03, 2021 | 3:42 PM

धुळे : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना ताजी असताना धुळ्यात देखील तशीच काहिशी घटना समोर आली आहे. डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सलग आठ महिने अत्याचार झाल्याची बातमी समोर आली होती. तर धुळ्यात एका विवाहितेवर दोन नराधमांनी तब्बल 15 वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडितेवर बलात्कार करतानाचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांनी पीडितेवर तब्बल 15 वर्षे बलात्कार केला. संबंधित घटना उघड झाल्यानंतर धुळ्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडिता गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराला कंटाळली होती. आरोपी पीडितेला लग्नाच्या आधी माहेरी असताना तसेच लग्नानंतर सासरी असताना देखील जबदरस्ती ब्लॅकमेल करत विविध हॉटेलवर नेत. तिथे ते तिच्यासोबत गैरकृत्य करत. त्यांच्या या जाचाने पीडिता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. त्यांच्यापासून सुरु असलेला छळ असह्य झाल्याने तिने अखेर पोलीस ठाण्यात जाण्याची हिंमत केली. तिच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा होता. पण तिने धैर्य एकवटून पोलीस ठाण्यात जाण्याचा निश्चय केला. ती धुळ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्यासोबत गेल्या 15 वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराबाबतची माहिती दिली. यावेळी पीडितेची तक्रार ऐकून पोलीसही हैराण झाले. पण पीडितेने इतके वर्ष त्रास सोसायला नको होता. पीडितेने तातडीने पोलिसात तक्रार करायला हवी होती, जेणेकरुन नराधमांना आतापर्यंत योग्य शिक्षाही घोषित झाली असती.

पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी नाना भदाणे याने पीडितेवर 2006 साली सर्वात पहिल्यांदा अत्याचार केला होता. धुळ्यातील अवधान येथे एका शाळेचे बांधकाम सुरु होते. त्या ठिकाणी तो पीडितेला घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला. तसेच त्याचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर आरोपी पीडितेला संबंधित व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देवून वारंवार तिच्यावर बलात्कार करु लागला.

या सर्व कामात आरोपीला त्याच्या आणखी एका जोडीदाराने साथ दिली. त्याने देखील पीडितेवर अत्याचार केला. हा सर्व प्रकार 2006 ते 2021 या काळात घडत होता. आरोपींनी आपला व्हिडीओ शेअर केला तर आपली बदनामी होईल, या भीतीने पीडिता इतके दिवस गप्प होती, पण अखेर त्यांचा त्रास असह्य झाल्याने तिने अखेर पोलीस ठाण्याची पायरी चढली, असं पीडिता आपल्या तक्रारीत म्हणाली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

डोंबिवलीत पीडितेवर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.

हेही वाचा :

Mumbai NCB Raid: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीतील आठ जण कोण?, नावं उघड, उद्योजकांच्या तीन मुलीही ताब्यात; एनसीबीकडून दोघांची कसून चौकशी सुरू

एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें