Amravati : पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू, कुऱ्हा – धामणगाव रेल्वे रोडवरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह हे रस्त्यालगतच्या पाण्याच्या डबक्यात सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी अक्षरशः रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात जाऊन पडली आणि तिथेच या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी शोधाशोध केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे.

Amravati : पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या तरुणांचा अपघातामध्ये मृत्यू, कुऱ्हा - धामणगाव रेल्वे रोडवरील घटना
अमरावती जिल्ह्यात भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असून घटनास्थळी नागरिकांची झालेली गर्दी.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:55 AM

अमरावती :  (Amravati) अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा ते धामणगाव रेल्वे मार्गावर गुंजी गावानजीक दुचाकीला अज्ञात वाहानाने (Accident) जोराची धडक दिली. या घटनेमध्ये दुचाकीवरील दोन्हीही (The death of young people) तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेत मृत्यू झालेले दोन्ही तरुण हे झारखंड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे .गुरुवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर हे तरुण फर्निचरच्या कामासाठी अमरावतीकडे मार्गस्थ होत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.

दोघांचेही मृतदेह पाण्याच्या डबक्यात

अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह हे रस्त्यालगतच्या पाण्याच्या डबक्यात सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी अक्षरशः रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात जाऊन पडली आणि तिथेच या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी शोधाशोध केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. मात्र, दोघांचीही जागेवरच मृत्यू झाला होता.

कामासाठी अमरावतीकडे निघाले होते तरुण

मुळचे झारखंड राज्यातील असलेले हे तरुण फर्निचरच्या कामासाठी अमरावतीकडे दुचाकीवर मार्गस्थ होत होते. रात्रीच्या वेळी भरधाव असलेल्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला तर पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

अज्ञात वाहनाने दिली धडक, शोध सुरु

गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हे दोन तरुण दुचाकीवरुन अमरावती शहराकडे मार्गस्थ होत होते. दरम्यान, कुऱ्हा ते धामणगाव रेल्वे मार्गावर गुंजी गावानजीक दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. रात्रीच्या वेळी रस्ते निर्मनुष्य असल्याने वाहनाचा शोधही लागला नाही. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेतच यांचा मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.