AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : पार्क केलेला ट्रक काढायला सांगितल्यावरून डोकं फिरलं, दुकानदाराला थेट मारहाण, दोघे अटकेत

कानासमोर पार्क केलेल्या टेम्पोवरून वाद सुरू झाल्यानंतर भडकलेल्या टेम्पो चालकाने दुकानदारावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Ulhasnagar Crime : पार्क केलेला ट्रक काढायला सांगितल्यावरून डोकं फिरलं, दुकानदाराला थेट मारहाण, दोघे अटकेत
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 23, 2023 | 11:14 AM
Share

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : शहरात सध्या अनेक गुन्ह्यांच्या (crime case) घटना घडत असून त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत मात्र तरीही बऱ्याच वेळेस गुन्हेगारांचा हैदोस सुरू असतो. वाढत्या अरेरावीमुळे लोकांना शांतपणे जगणं कठीण होत चाललं आहे. अशाच एक मस्तवाल टेम्पोवाल्यामुळे दुकानदाराला त्रास सहन करावा लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

दुकानासमोर पार्क केलेल्या टेम्पोवरून वाद सुरू झाल्यानंतर भडकलेल्या टेम्पो चालकाने दुकानदारावर (attack on shopkeeper) जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तो दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पीडित इसमाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी ट्रक चालकाला साथीदारासह शोधून काढले आणि त्या दोघांना बेड्या ठोकत अटक केली.

कुठे घडला हा प्रकार ?

उल्हासनगर शहरातील कॅम्प १ येथे बिर्ला गेटसमोर हरीश मदन गोपाल सोनी यांचे ‘श्री अंबिका ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हरीश मदन गोपाल सोनी हे त्यांच्या दुकानात बसले असताना त्यांच्या दुकानासमोर एका टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो थांबवला. मात्र मदन यांना त्यांची गाडी दुकानासमोर उभी करायची होती. त्यामुळे त्यांनी टेम्पो चालकाला त्याचा ट्रक दुकानासमोरून हटवण्यास सांगितले, पण त्याने काही ऐकले नाही. मदन यांनी तीन चार वेळा त्याला ट्रक दुकानासमोरून हटवण्यास सांगितले. यामुळे तो ट्रकचालक संतापला आणि त्याने ट्रक तिथून न काढता थेट दुकानदार मदन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच त्याने त्यांना लाथाही मारल्या.

मात्र एवढं करूनही त्याचं काही समाधान झालं नाही, संतापाच्या भरात त्याने त्याच्या ट्रकमधून एक लोखंडी रॉड काढला आणि त्या रॉडनेच मदन यांच्यावर वार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले, बराच रक्तस्त्रावही झाला. आजूबाजूच्यांनी त्या टेम्पो चालकाला बराच रोखण्याच प्रयत्न केला. कसाबसा तो थांबला. अखेर मदन यांना इतरांनी तातडीने जखमी अवस्थेतच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. याप्रकरणी दुकानदार मदन यांच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि ट्रक चालकाविरोधात फिर्याद नोंदवली.

त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ट्रकचालक बाजीराव दत्तू पेचे आणि किरण गौतम थोरात या दोघांनाही बेड्या ठोकत अटक केली. त्या दोघांविरोधातही प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.