AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DK Rao Arrest : मुंबई अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी, गँगस्टर डी.के. रावला उचललं

DK Rao Arrest : मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच साम्राज्य मोडून काढलं. 90 च्या दशकात मुंबईच्या रस्त्यांवर टोळी युद्धाचा भडका उडाला होता. अनेक खून झाले. निष्पाप व्यक्तींच रस्त्यावर रक्त साडलं. आता पुन्हा एकदा मुंबईत अंडरवर्ल्ड सक्रीय होण्याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी.के.रावला पोलिसांनी अटक केली आहे.

DK Rao Arrest : मुंबई अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी, गँगस्टर डी.के. रावला उचललं
DK Rao arrest
| Updated on: Jan 23, 2025 | 11:52 AM
Share

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला अटक झाली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक झाली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपात अटक झाली आहे. अडीच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केलीय. डी के राव आणि सहा जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. डी के रावला 2017 सालच्या खंडणीच्या गुन्ह्यात 2022 साली हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता. डी के राव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. डी के राव पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

डी के राव हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. खंडणी, दरोडा आणि अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये याआधी सुद्धा त्याला अटक झाली आहे. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात छोटा राजनचा खास हस्तक अशी डी के रावची ओळख आहे. मुंबईतील बिझनेसमन, बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप त्याच्यावर झाले आहेत. विविध गुन्ह्यांखाली त्याला अनेकदा अटक झाली आहे.

छोटा राजनचा राईट हॅन्ड

एफआयआर नोंदवण्यात आला असून डीके रावसह सर्व सात आरोपींना अटक झाली आहे. पुढील तपास सुरु आहे. डी के राव हा दिलीप मल्लेश वोरा नावाने सुद्धा ओळखला जातो. मुंबईच्या माटुंग्यात जन्मलेल्या डी के रावच बालपण झोपडपट्टीमध्ये गेलं. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मोठा झाल्यानंतर चुकीची संगत लागली. चोरी आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी झाला. त्यानंतर तो छोटा राजन टोळीत सहभागी झाला. बँकेत दरोडा, मोठ्या व्यावसायिकांची हत्या अशा गुन्ह्यांमध्ये डी.के.रावच नाव आलं. हळू हळू राव छोटा राजनचा राईट हॅन्ड झाला.

छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन वसुली करायचा

छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन डी के राव बिल्डर्सकडून वसुलीची कामे करायचा. कोणी नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अनेकदा तो तुरुंगात गेला. तिथून सुटल्यानंतरही तो असेच गुन्हे करत राहिला. म्हणून पुन्हा एकदा त्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर