वरात ऐन रंगात आली असताना एक तरुणी तिथे पोहोचली, तिने वराशी आपले प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. आपण दोघेही हॉटेलमध्ये एकत्र काम करायचो. तेव्हा आमची भेट झाली, ओळखीचं रुपांतर पुढे मैत्री आणि प्रेमात झालं. तरुणाने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे, अशी आपबिती तरुणीने मांडली.
लखनौ : उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील शाहगंज भागात मंगळवारी रात्री एक विचित्र घटना घडली. फतेहपूर सिक्री येथून निघालेल्या लग्नाच्या वरातीत अचानक एक तरुणी येऊन धडकली. तिने आपण नवरदेवाची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावा केला. तसंच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत मोठा गोंधळ घातला. नवरदेवाने लग्न करण्यास सपशेल नकार दिल्यानंतर तरुणीने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही जणांनी तिला अडवले. मात्र या गोंधळानंतर वधूच्या मामाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.