AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Extramarital Affair : पदरात दोन मुलं असताना बायकोकडून विश्वासघात, नवऱ्याला शॉक बसला, त्याची स्थिती बघून सगळेच हळहळले

Extramarital Affair : वकिलाच आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला दोन लहान-लहान मुलं आहेत. काही महिन्यांपासून वकिलाच्या पत्नीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. नातेवाईकांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला.

Extramarital Affair : पदरात दोन मुलं असताना बायकोकडून विश्वासघात, नवऱ्याला शॉक बसला, त्याची स्थिती बघून सगळेच हळहळले
extramarital affair case
| Updated on: Oct 27, 2025 | 2:19 PM
Share

एका वकिलाला त्याच्या पत्नीने दगा दिला. पदरात दोन मुलं असताना ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवऱ्याला हा धक्का सहन झाला नाही. त्याने विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत नवऱ्याला जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनुसार त्याची हालत गंभीर आहे. पतीने एक सुसाइड नोट लिहिली आहे. त्यात त्याने लिहिलय की, माझी मुलं माझ्या पत्नीकडे देऊ नयेत. पोलीस या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील हे प्रकरण आहे.

कँट पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. बरेली येथे राहणाऱ्या या वकिलाच आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला दोन लहान-लहान मुलं आहेत. काही महिन्यांपासून वकिलाच्या पत्नीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. नातेवाईकांनी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकली नाही. काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून गायब झाली. सासरच्यांना वाटलं की, ती माहेरी गेलीय. पण ती सापडली नाही, तेव्हा पतीने तिचा शोध सुरु केला. नंतर समजलं की, ती तिच्या प्रियकरासोबत पळून दलीय. हे सत्य समजताच नवरा कोलमडून गेला.

‘मी आता जगू शकत नाही’

पत्नी सोडून गेल्यानंतर पती डिप्रेशनमध्ये गेला. त्याने घरात विष प्राशन केलं. नातेवाईकांना ते बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्यांच्या खिशात एक सुसाइड नोट मिळाली. त्यात लिहिलेलं की, “मी आता जगू शकत नाही. जिने मला आणि माझ्या मुलांना धोका दिला, तिला माझ्या मुलांजवळ जाऊ देऊ नका. ही नोट वाचल्यानंतर कुटुंबातील सदस्य भरपूर रडले” पोलिसांनी सुसाइड नोट आपल्या ताब्यात घेऊन तपास सुरु केलाय.

आजी-आजोबांना मुलांची अवस्था बघून खूप वाईट वाटतं

पोलिसांनुसार हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक तणावाशी संबंधित आहे. वकिलाची पत्नी आणि तिचा प्रियकर सध्या बेपत्ता आहेत. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. पती सध्या रुग्णालयात दाखल आहे. तो स्टेटमेंट देण्याच्या स्थितीमध्ये नाही. ते शुद्धीत आल्यानंतर स्टेटमेंट नोंदवलं जाईल. कुटुंबातील सदस्यांना मुलांची चिंता आहे. आजी-आजोबांना मुलांची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. त्यांनी पोलिसांना विनंती केलीय की, पत्नी आणि तिच्या प्रियकराला लवकर पकडा.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.