AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न सोहळ्यानंतर विवाहितेवर गँगरेप, कॅटररसह पाच जणांचा शोध

लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने कॅटररने पीडित महिलेला निर्जन स्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला ( Woman Gang Rape by Caterers)

लग्न सोहळ्यानंतर विवाहितेवर गँगरेप, कॅटररसह पाच जणांचा शोध
केटररसह पाच जणांचा महिलेवर सामूहिक बलात्कार
| Updated on: Apr 27, 2021 | 12:22 PM
Share

लखनौ : महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्याबाबत उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि यूपी पोलिस दावे करत असूनही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. आग्य्रात विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे. (Uttar Pradesh Crime Agra Helper Woman Gang Rape by Caterers after Wedding Ceremony)

कामाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले

लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या आमिषाने कॅटरर आणि एका व्यक्तीने पीडित महिलेला निर्जन स्थळी नेले. तिथे तिघे जण आधीच उपस्थित होते. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाले.

लग्न सोहळ्यात कॅटरिंगमध्ये मदतनीस

शुद्ध आल्यानंतर पीडितेने पोलिसात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिला छोटेखानी समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते. आग्र्यातील संबंधित लग्न सोहळ्यात पुरी तळण्याच्या कामासाठी ती गेली होती.

बरहन पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेची वैद्यकीय चाचणी केली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे. आग्रा ग्रामीण पोलीस अधीक्षक सत्यजीत गुप्ता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप

झारखंड जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांपूर्वीच वासनांधता आणि क्रूरतेचा अक्षरशः कळस पाहायला मिळाला होता. 35 वर्षीय महिलेवर तब्बल 11 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. गँगरेप करणारे आठ आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर बलात्कार पीडितेलाही कोरोना संसर्ग झाल्याची माहिती आहे. ( Woman Gang Rape by Caterers)

शस्त्राच्या धाकाने महिलेचं अपहरण

पीडित महिला संध्याकाळच्या वेळेस शौच करण्यासाठी चालली होती. यावेळी वाटेत काही युवक मद्यपान करत बसले होते. महिला एकटीच असल्याचं पाहून त्यांनी शस्त्राच्या धाकाने तिचं अपहरण केलं. काही अंतरावर झाडीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या आणखी काही नातेवाईकांनाही बोलावून घेतलं. अकरा जणांनी अख्खी रात्र महिलेवर अत्याचार केले.

संबंधित बातम्या :

कृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न

क्रूरतेचा कळस! 35 वर्षीय महिलेवर 11 जणांचा गँगरेप, आठ जण कोरोनाग्रस्त, पीडितेलाही संसर्ग

मित्रासोबत फिरायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणीवर गँगरेप, पाच जणांना अटक

(Uttar Pradesh Crime Agra Helper Woman Gang Rape by Caterers after Wedding Ceremony)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.