लव्ह मॅरेज ठरलं! लग्नाच्या पाच दिवसांआधी नवरदेवाकडून वधूची हत्या

लग्नानिमित्त तुझ्यासाठी काही साड्या खरेदी करायच्या आहेत, असं सांगून नवरदेवाने तरुणीला बोलावलं आणि तिची हत्या केल्याचा आरोप आहे

लव्ह मॅरेज ठरलं! लग्नाच्या पाच दिवसांआधी नवरदेवाकडून वधूची हत्या
लग्नाच्या तोंडावर नववधूची हत्या

लखनौ : लग्नाच्या तोंडावर नवरदेवानेच वधूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. लग्न खरेदीच्या बहाण्याने बोलावून नवरदेवाने गळा आवळून वधूची हत्या केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीसोबत लग्न करण्याची इच्छा नसल्यामुळे तरुणाने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. (Uttar Pradesh Crime News Fiancé killed Bride ahead of Wedding)

साडी खरेदीच्या बहाण्याने भेट

उत्तर प्रदेशातील मोरादाबादमध्ये सोमवारी हा प्रकार घडला. लग्नाला अवघे पाच दिवस बाकी असताना ही घटना घडली. सोमवारी टिनाला तिचा होणारा नवरा जतीनने फोन केला. लग्नानिमित्त तुझ्यासाठी काही साड्या खरेदी करायच्या आहेत, असं त्याने टिनाला सांगितलं. त्यानुसार सकाळी 11 वाजता टिनाच्या आईने तिला जवळच्या बस स्टँडवर सोडलं, अशी माहिती तिचा नातेवाईक विपीनने दिली.

टिनाचा मृतदेह गावाबाहेरील रस्त्यावर

जतीन आपल्या घरी परतला, मात्र टिना घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास टिनाचा मृतदेह गावाबाहेरील रस्त्यावर पोलिसांना सापडला. त्यांनी तिच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली. त्यावेळी टिना जतीनला भेटायला गेली होती, असं तिच्या कुटुंबाने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जतीनला ताब्यात घेतलं. टिनाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

टिना आणि जतीन यांचं लव्ह मॅरेज

साडी खरेदीच्या निमित्ताने बाहेर नेऊन जतीननेच टिनाची गळा दाबून हत्या केली, असा आरोप टिनाच्या कुटुंबाने केला आहे. धक्कादायक म्हणजे टिना आणि जतीन यांचं लव्ह मॅरेज होणार होतं. जतीनला लग्नाला आक्षेप होता, तर त्याने लग्न मोडायचं होतं, आपल्या मुलीचा जीव घेण्याची काय गरज होती, असा प्रश्न टिनाचे कुटुंबीय विचारत आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

पुण्याचं कुटुंब पिकनिकला रवाना, सासवडमध्ये आईचा, कात्रजला चिमुकल्याचा मृतदेह सापडला, पती बेपत्ता

(Uttar Pradesh Crime News Fiancé killed Bride ahead of Wedding)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI