AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Hello सर! इथे 15 तुकडे करुन मृतदेह ड्रममध्ये टाकलाय..’, लहान मुलीच्या फोनवरुन पोलीस लगेच तिथे पोहोचले, पण…

एका 10 वर्षाच्या मुलीने पोलिसांना फोन करुन सांगितलं की, निळ्या ड्रममध्ये महिलेचे 15 तुकडे केलेला मृतदेह आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ते सुद्धा हैराण झाले. प्रकरण असं होतं की, पोलिसांना या बद्दल समजल्यानंतर ते ही चक्रावले.

‘Hello सर! इथे 15 तुकडे करुन मृतदेह ड्रममध्ये टाकलाय..', लहान मुलीच्या फोनवरुन पोलीस लगेच तिथे पोहोचले, पण...
Representative image Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 12, 2025 | 11:41 AM
Share

उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये पोलिसांना एक फोन आला. कॉलरने सांगितलं की, ‘Hello सर! इथे एका महिलेचे 15 तुकडे करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकलाय..’. हे ऐकताच यूपी 112 पोलीस हडबडले. त्यांनी पुढे डिटेल मागितल्यानंतर कॉलरने काही न बोलता फोन कट केला. पोलिसांनी नंतर फोन नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. पोलीस नंतर, ज्या घरातून फोन आला होता, तिथे पोहोचले. त्यावेळी एक वेगळीच गोष्ट समोर आली. तरीही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ज्या घरातून कॉल आलेला, त्यांनी सांगितलं की, त्यांच्या 10 वर्षाच्या मुलीने हा खोडकरपणा केलाय. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यूपी 112 पोलिसांना एका नंबरवरुन कॉल आला. कॉलरने सांगितलं की, बलीपूरमध्ये एका महिलेची हत्या करुन मृतदेहाच 15 तुकडे करण्यात आलेत. हे सर्व तुकडे निळ्या ड्रममध्ये भरुन ड्रम सिमेंटने बंद करण्यात आला आहे. या कॉलमुळे 112 यूपी पोलीस हादरले. यूपी 112 पीआरवी 3496 पोलीस बलीपूर गावात पोहोचले. कॉलरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कॉलरने मोबाइल बंद केलेला.

उत्तमला पकडून पोलीस ठाण्यात नेलं

यूपी 112 पोलिसांनी याची फतेहगढ़ कोतवाली व कमालगंज पोलीस ठाण्यात माहिती दिली. बलीपूर गाव कमालगंज पोलीस ठाणे क्षेत्रात येत असल्याने इंस्पेक्टर राजीव कुमार पोलीस टीमसह तिथे पोहोचले. घटनेची चौकशी केली. पण गावात असं काही घडलं नसल्याच समजलं. इंस्पेक्टरने कॉल करणाऱ्या सीडीआर काढून लोकेशन ट्रेस केलं. फतेहगढ़ कोतवाली याकूतगंज चौकी येथील निवासी उत्तम कुमार अशी कॉलरची ओळख निघाली. लोकेशन ट्रॅक करुन पोलीस उत्तमला पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

कॉल करणारी मुलगी आहे की युवक?

पोलीस चौकशीत उत्तमने सांगितलं की, तो पंचायतीराज विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. सध्या खुदागंज गावात ड्युटीवर आहे. तो पत्नी नीतू सोबत याकूतगंज बाजारात गेला होता. घरात पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी एकटी होती. तिनेच मोबाइलवरुन फोन करुन खोट सांगितलं. पोलिसांनी या बद्दल मुलीला विचारल्यानंतर ती म्हणाली की, युट्यूबवर महिलेचे तुकडे करुन मृतदेह ड्रममध्ये टाकत असल्याच पाहून पोलिसांना कळवलं. प्रभारी निरीक्षक राजीव कुमार यांनी सांगितलं, की प्रकरणाचा तपास सुरु आहे. यूपी 112 पोलीस कॉल सेंटरवरुन रेकॉर्डिंग चेक करणार. कॉल करणारी मुलगी आहे की युवक?.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.