AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातवंड असलेल्या आजीचा 35 वर्षाच्या तरुणावर जडला जीव, दोघे लपून-छपून भेटायचे, मग एक दिवस दोघांनी असं कांड केलं, की….

प्रेम एक अशी गोष्ट आहे जी कधीही, कुठेही, कोणावरही जडू शकते. त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. आजकाल तुम्ही अशी अनेक प्रकरण पहाल, ज्यात लोक लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवतात.

नातवंड असलेल्या आजीचा 35 वर्षाच्या तरुणावर जडला जीव, दोघे लपून-छपून भेटायचे, मग एक दिवस दोघांनी असं कांड केलं, की....
Representative Image
| Updated on: Oct 03, 2025 | 4:17 PM
Share

प्रेम एक अशी गोष्ट आहे जी कधीही, कुठेही, कोणावरही जडू शकते. त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. आजकाल तुम्ही अशी अनेक प्रकरण पहाल, ज्यात लोक लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवतात. उत्तर प्रदेशच्या झांशीमध्ये एका आजीबाईंनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. तिला दोन नातू सुद्धा आहेत. मोठं कुटुंब आहे. पण तरीही आजीबाईंवर प्रेमाची अशी नशा स्वार झाली की, ती एका 35 वर्षाच्या युवकासोबत पळून गेली. सोबतच घरातून निघताना कॅश आणि सुनेचे दागिने घेऊन पसार झाली. आता कुटुंब पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहे. कुटुंब आर्थिक दृष्ट्‍या कमकुवत आहे. आजी जेव्हापासून पळालीय, कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीय. पैशामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

ही प्रेम कथा मऊरानीपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. स्यावरी गावात कामता प्रसाद आदिवासी आपल्या कुटुंबासोबत राहतात. घरी पत्नी, दोन मुलं, दोन सुना आणि दोन नातू असा परिवार आहे. पण सध्या ते पत्नीसाठी तुरुंगाच्या फेऱ्या मारत आहेत. कामता प्रसाद यांची पत्नी सुखवती आपल्या 35 वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली. सोबत कॅश आणि दागिने घेऊन पळाली. सुनांचे दागिने घेऊन पळाली. यामुळे कामता प्रसाद यांचं कुटुंब आर्थिक आणि भावनिक दोन्ही आघाडीवर कोसळून गेलय.

मी फोन चेक केला, त्यात अमरचा नंबर होता

मी पेशाने रोजंदारी मजूर आहे. मेहनत करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. अडीच वर्षांपूर्वी मी पत्नीसोबत भिंड-मुरैना क्षेत्रात गेलो होतो. तिथे आम्हाला काम मिळालं. तिथे माझी पत्नी सुखवतीची मैत्री अमर सिंह प्रजापतीशी झाली. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु झालं. आधी आम्हाला संशय आला नाही. पण नंतर मला समजलं की पत्नी दिवसभर फोनवर कोणाशी तरी बोलत असते. मी फोन चेक केला. त्यात अमरचा नंबर होता असं कामता प्रसाद आदिवासीने सांगितलं.

लपून-छपून अमरला भेटतच होती

कामता प्रसादने सांगितलं की, माझ्या दोन्ही सुनांना सुखवतीवर संशय आला. आम्ही तिला सांगितलं की, तू अमरशी बोलत जाऊ नकोस. पण ती लपून-छपून अमरला भेटतच होती. काही दिवसांपूर्वी मी माझ्या मुलाला उपचारासाठी झांसीला घेऊन गेलेलो, त्यावेळी सुखवतीने संधी साधून घरातून दागिने आणि जवळपास 40 हजार रुपये घेऊन अमरसोबत पसार झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...