AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियकराचा मृतदेह रुळावर, वैष्णवीचा मृतदेह कुठे होता? अखेर झाडाच्या ‘L01-501’ कोडने उलगडलं रहस्य

वैष्णवी बाबर 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण पुन्हा ती घरी आलीच नाही. त्याचदिवशी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. काय होतं ‘L01-501’ कोडच रहस्य?

प्रियकराचा मृतदेह रुळावर, वैष्णवीचा मृतदेह कुठे होता? अखेर झाडाच्या ‘L01-501’ कोडने उलगडलं रहस्य
Vaishnavi Babar death Case
| Updated on: Jan 19, 2024 | 12:48 PM
Share

नवी मुंबई : मागच्या महिन्यात 12 डिसेंबर 2023 पासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय मुलीचा अखेर शोध लागला आहे. प्रियकराने मागे ठेवलेल्या एका कोडमधून धक्कादायक सत्य समोर आलं. प्रियकराने आधी या मुलीची हत्या केली, नंतर स्वत:च जीवन संपवलं. नवी मुंबई येथील खारघरच्या जंगलात वैष्णवी बाबर या मुलीचा मृतदेह सापडला. 24 वर्षीय आरोपी वैभव बुरुंगळेने खारघरच्या जंगलात वैष्णवीला गळा आवळून मारलं. वैभवने वैष्णवीला मारल्यानंतर स्वत:च जीवन संपवलं. त्याने मागे एक कोड ठेवला होता. तो कोड उलगडल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. त्यातून धक्कादायक वास्तव उजेडात आलं.

वैष्णवी बाबर 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण पुन्हा ती घरी आलीच नाही. त्याचदिवशी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्याचदिवशी जुईनगर रेल्वे स्टेशनच्या रुळावर वैभव बुरुंगळेचा मृतदेह सापडला. त्याने ट्रेनसमोर उडी मारुन आपल जीवन संपवलं होतं. वैभवच्या मृत्यूची नोंद करण्यात आली व चौकशीसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.

काय होतं ‘L01-501’ कोडच रहस्य?

वैभवने जीवन संपवण्याआधी त्याच्या मोबाइलमध्ये एक नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने वैष्णवीची हत्या केल्याच म्हटलं होतं. आपणही जीवन संपवत असल्याच त्याने लिहिलं होतं. मोबाइलवरच्या नोटमध्ये वैभवने ‘L01-501’ हा कोड लिहून ठेवला होता. पोलीस बरेच दिवस या कोडच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते. कारण वैष्णवीची हत्या केली, तर तिचा मृतदेह कुठे आहे? याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. अखेर ‘L01-501’ हा वनखात्याने झाडांवर लिहिलेला क्रमांक असल्याच समजलं. वनखात्याने जंगलातील झाडांना हे नंबर दिले होते. ज्या झाडावर ‘L01-501’ हा क्रमांक होता, तिथे पोलीस पोहोचले.

मृतदेह शोधण्यासाठी किती यंत्रणा लागलेल्या कामाला?

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात वैष्णवी बेपत्ता झाली त्या दिवशी दोघे खारघर हिल्स परिसरात एकत्र दिसले होते. पोलिसांची टीम, वन अधिकारी, फायर ब्रिगेड आणि सिडकोने मिळून शोध मोहिम सुरु केली. ड्रोनची सुद्धा मदत घेतली. 10 दिवस हा शोध सुरु होता, असं पोलिसांनी सांगितलं. अखेर ‘L01-501’ झाडाजवळच्या झुडुपात वैष्णवीचा मृतदेह सापडला. वैष्णवीने घातलेल्या ड्रेसवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.