Video : मोफत जेवण दिलं नाही, मुंबईतील पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Video : मोफत जेवण दिलं नाही, मुंबईतील पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
पोलीस कर्मचाऱ्याकडून हॉटेल चालकाला मारहाण

मध्यरात्रीनंतर मोफत जेवण आणि दारू देण्यास हॉटेल कर्मचाऱ्यानं नकार दिला. त्यामुळे वाकोला हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरत आहे. गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास वाकोला पोलिस ठाण्याजवळील 'स्वागत' रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळकतेय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 24, 2021 | 10:19 AM

मुंबई : हॉटेल चालकाकडून मोफत बिर्याणी मागवण्याचा पुणे पोलिसांतील एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मुंबईत एका पोलीस (Mumbai Police) अधिकाऱ्याने मोफत जेवण दिलं नाही म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालीय. या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस (Vakola Police) ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मध्यरात्रीनंतर मोफत जेवण आणि दारू देण्यास हॉटेल कर्मचाऱ्यानं नकार दिला. त्यामुळे वाकोला हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरत आहे. गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास वाकोला पोलिस ठाण्याजवळील ‘स्वागत’ रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळकतेय. हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओनुसार, विक्रम पाटील नावाचा अधिकारी कॅशियरकडे जातो. त्याचा शर्ट ओढतो आणि त्याला मारहाण करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल

दिवसभर रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर बंद होते. त्यामुळे हॉटेल कर्मचारी त्या पोलीस अधिकाऱ्याला मध्यरात्री साडे बारा वाजता मोफत जेवण देऊ शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याच्या अंगावर जात त्याला मारहाण केली. याबाबत वाकोला पोलीस ठाण्यात विक्रम पाटील यांच्याविरोधात आयपीसी कलम 323 नुसार तक्रार करण्यात आली आहे. तशी माहिती असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली आहे. याबाबतची माहिती फ्री प्रेस जनरलने दिली आहे.

इतर बातम्या :

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव वाढला! मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक, राज्यात पुन्हा कडक निर्बंध?

Uddhav Thackeray : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले! मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो समोर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें