लावणीसम्राज्ञी VIJAYA PALAV यांच्यावरती जीवघेणा हल्ला, बिल्डरसह कुटुंबाची गुंडा गर्दी, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राहत असलेल्या इमारतीत बिल्डर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून हल्ला केल्याचा आरोप पालव यांनी केला आहे. विशेष म्हणजे बिल्डर मनमानी आणि गुंडा गर्दी करत आहे.

लावणीसम्राज्ञी VIJAYA PALAV यांच्यावरती जीवघेणा हल्ला, बिल्डरसह कुटुंबाची गुंडा गर्दी, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लावणीसम्राज्ञी विजया पालवImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 2:13 PM

ठाणे –  महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विजया पालव (vijaya palav) यांच्यावर दिवा (diva) येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. राहत असलेल्या इमारतीत बिल्डर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून हल्ला केल्याचा आरोप पालव यांनी केला आहे. विशेष म्हणजे बिल्डर मनमानी आणि गुंडा गर्दी करत आहे. या प्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात पालव यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंब्रा पोलीस (mubra police) या प्रकरणाची कसून चौकशी करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवरती मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आगोदर सुध्दा दोन कुटुंबात अनेकदा वाद झाले आहेत. परस्पर बिल्डर पत्रव्यवहार करीत असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.

बिल्डरसह कुटुंबाची गुंडा गर्दी

विजया पालव यांच्यावर दिवा येथे आपल्या राहत असलेल्या इमारातीच्या बिल्डर कुटुंबीयांनी मारहाण केली. मारहाणीत विजया पालव यांना दुखापत झाली असून त्यांना ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर विजया यांना घरी सोडण्यात आले आहे. विजया पालव यांनी आपल्या घरी प्लंबरला घरातील काम करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी बिल्डरने प्लंबरला हटकले आणि विजया पालव यांना बोलावून घेण्यास सांगितले. बाहेरील व्यावसायिकांना कुठलेही काम देऊ नये असा दम देण्यास सुरुवात केली. विजया पालव यांनी बिल्डरच्या मनमानीला विरोध केल्यानंतर बिल्डर चेतन पाटील यांने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून विजया यांच्या कानाखाली मारल्या असल्याचा आरोपा पालव यांनी केला आहे. तसेच त्यानंतर बिल्डर चेतन पाटील आणी त्याची आई, बायको, भाऊ आणि इतर सहकाऱ्यांनी विजया यांना जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे.

जीवे मारण्याची धमकी

या आगोदर सुध्दा विजया पालव यांनी बिल्डरच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुध्दा बिल्डर आणि त्यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले होते. बिल्डरला त्यावेळी देखील सोसायटी मधील काही जणांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यानंतर देखील बिल्डरची मनमानी आणि गुंडा गर्दी सुरूच असून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप विजया पालव यांनी केला आहे. तर बिल्डर ने पालव यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला

दिव्यातील सोनू पॅलेस या इमारतीमध्ये विजया पालव राहतात. त्या इमारतीची देखभाल चेतन पाटील हे पाहतात. मात्र यावेळी इमारतीत बाहेरील व्यक्ती आल्यामुळे त्यांनी व्यक्तीला हटकले आणि ज्या व्यक्तीने बोलावले त्यांना बोलावून घेण्यास सांगितले. त्यानंतर विजया पालव आणि चेतन पाटील या दोघांचे कुटुंब समोरासमोर आले. त्यांच्यात वादविवाद होऊन दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानुसार मुंब्रा पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली आहे.

विजय पालव यांनी आमच्याशी भांडायला सुरूवात केली – बिल्डर

बाहेरचा माणूस इथं काय करतोय हे विचारल्यानंतर विजय पालव यांनी आमच्याशी भांडायला सुरूवात केली. त्यावेळी माझे घरचे देखील मोठ्या आवाजाने घरातून बाहेर आले. त्यावेळी विजय पालव यांनी आमच्या कुटुंबासोबत भांडण करायला सुरूवात केली. विजय पालव यांनी माझ्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच सगळ्यांना अडकवण्याची धमकी देखील दिली आहे असा दावा चेतन पाटील यांनी केला आहे.

Maharashtra News Live Update : पालिकेची भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस, अतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप

महिला अर्थसाक्षरतेचे भीषण वास्तव; आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग कधी वाढणार?

विमान कंपन्यांवर कर्जाचा डोंगर; संकटात सापडलेल्या कंपन्यांकडून मदतीसाठी सरकारचा धावा

Non Stop LIVE Update
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.