बकऱ्यांच्या चोरीसाठी इनोव्हा, पोलिसांनी हायटेक चोरट्यांना ठोकल्या बेड्या

वर्धा शहर पोलिसांनी बकऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे. Wardha Police sheep Theft

बकऱ्यांच्या चोरीसाठी इनोव्हा, पोलिसांनी हायटेक चोरट्यांना ठोकल्या बेड्या
वर्धा पोलीस

वर्धा : वर्धा शहर पोलिसांनी बकऱ्या चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे. वर्धा पोलिसांनी आरोपींना थेट नागपूरमधून ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी इनोव्हा कारसह   4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वर्धा पोलीस स्टेशनला 4 बकऱ्यांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. (Wardha City Police Arrested two Persons from Nagpur for Sheep Theft)

25 हजार रुपये किमंतीच्या बकऱ्या चोरण्यासाठी 4 लाखांची इनोव्हा

वर्धा शहरातील महेश जयस्वाल यांनी त्यांच्या 4 बकऱ्या चोरी झाल्याची तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. हा सर्व प्रकार 29 जानेवारी रोजी घडला. महेश जयस्वाल 14 बकऱ्या चारण्यासाठी त्यांच्या घराजवळील मैदानावर गेले होते. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना काम लागल्यानं ते मार्केटला गेले. त्यानंतर सांयकाळी घरी आल्यानंतर पाहिले असता त्यांना 10 बकऱ्या आढळल्या. यानंतर महेश जयस्वाल यांनी चार बकऱ्यांची चोरी झाली असून त्यांची किंमत 25 हजार असल्याची तक्रार दिली. यानंतरी वर्धा शहर पोलिसांनी तक्रार दाखल करुन चौकशी सुरु केली.

4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा शहर पोलिसांना या गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर गाठले. नागपूरमध्ये आरोपी शुभम कराडे, रा. न्यू ठवरे कॉलनी जरीपटका, नागपूर आणि प्रणय बनसोड, रा. एम.आय.जी . कॉलनी यांना ताब्यात घेतलं आहे.वर्धा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बकऱ्या चोरीसाठी वापर केलेली 4 लाख रुपयांची जुनी इनोव्हा गाडी, 20 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.

वर्धा पोलिसांनी ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या आदेशानुसार सहा. पोलीस निरीक्षक निर्मला किन्नाके, पोलीस उपनिरीक्षक चेतन बोरखेडे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस अंमलदार सचिन इंगोले, दिपक जंगले राजेंद्र ढगे यांनी तपास केला.

संबंधित बातम्या :

संजय राठोड नॉट रिचेबलच, चर्चगेटच्या घरातील नोकर म्हणतात…

सांगलीत हवेत गोळीबार, डोळ्यात चटणी टाकून चौघांवर तलवार-कोयत्याने वार

चाकणमध्ये दीड लाखांचा गुटखा जप्त, 100 दिवसांत 5 कोटींचा मुद्देमाल आणि 500 गुन्हे दाखल, कृष्णप्रकाश यांचा दणका!

(Wardha City Police Arrested two Persons from Nagpur for Sheep Theft)

Published On - 1:23 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI