AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं, मुलांनी मारल्या उड्या त्यानंतर समोर आलं भयानक सत्य!

पाण्यात असं काहीतरी तरंगत होतं की जे पाहून सर्वांनाच बसला धक्का, पण जर त्या मुलांनी उडी नसती घेतली तर कधीच सत्य उलगडलं नसतं.

पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं, मुलांनी मारल्या उड्या त्यानंतर समोर आलं भयानक सत्य!
| Updated on: Apr 02, 2023 | 10:45 PM
Share

Crieme News : प्रेम करणं सोपं असतं, पण आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोच. आपलं प्रेम आपल्याला सहजासहजी कधीच मिळत नसतं. आजकाल तर लव्ह मॅरेज करताना घरच्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. मग काही कपल्स घरच्यांच्या विरोध असला तरी पळून जाऊन लग्न करतात. पण काही कपल्स असे असतात जे घरच्यांनी विरोध केल्यानंतर टोकाचं पाऊल उचलतात. तर आता अशीच एक घटना समोर आली आहे.

घरातील सदस्य लग्नासाठी तयार न झाल्यामुळे एका प्रेमी युगुलाने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये प्रेयसीचा जीव वाचला असून प्रियकर बेपत्ता आहे. ही धक्कादायक घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील जगद्दल भागात घडली आहे.

जगद्दल येथील सत्तावीस वर्षीय मोहम्मद मुख्तार या तरूणाचं एका एकोणीस वर्षांच्या मुलीवर प्रेम होतं. परंतु या नात्याला मुलाच्या घरच्यांचा विरोध होता. मिळालेल्या माहितीनुसार या प्रेमी युगुलाने शनिवारी (1 एप्रिल) हुगळी नदीवरील ज्युबली पुलावरून गंगेत उडी मारली. त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी मुलीचा जीव वाचवला मात्र, तरुण अद्यापही बेपत्ता आहे.

चुंचुडा तामलीपाडा घाटातील काही स्थानिक रहिवाशांनी मुलीला गंगेत तरंगताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिला नदीतून बाहेर काढून चुंचुडा रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बचाव कार्यादरम्यान उपस्थित असलेले शिबू माझी यांनी सांगितलं की, “काही मुलांनी मुलगी नदीत तरंगताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिला वाचवलं.”  ते पुढे म्हणाले की, “या मुलीनं दावा केला की तिनं आणि तिच्या प्रियकरानं एकत्र गंगेत उडी मारली होती, परंतु तरुण अद्यापही सापडलेला नाहीये.  पोलिसांच्या पथकानं त्याचा शोध सुरू केला आहे.

तरुणीचे नातेवाईक जियाउल मंडल यांनी सांगितलं की, तरुणाने आमच्या मुलीला फोन करून पळून जाण्यास सांगितलं. त्यानंतर चुंचुडा येथील एका व्यक्तीनं फोन करून आम्हाला पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यास सांगितलं, असेही त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्क होते. मात्र, मुलाच्या आईने लग्नाला होकार दिला नाही. त्याने रमजान महिन्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण प्रेमी युगुल त्याच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे ते घरातून पळून गेले.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.