AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketki Chitale : केतकीला तो मेसेज पाठवणारी ती व्यक्ती कोण? पोलिसांचा शोध सुरू

पोलिसांना असा संशय आहे की तो मेसेज केतकीने बनवलाच नव्हता तर तिला तो कोणी दुसऱ्यानेच पाठवला होता. त्यामुळे पोलिस सध्या ती व्यक्ती कोण याचा तपास करत आहेत.

Ketki Chitale : केतकीला तो मेसेज पाठवणारी ती व्यक्ती कोण? पोलिसांचा शोध सुरू
केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढलाImage Credit source: tv9
| Updated on: May 18, 2022 | 11:11 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकारण हे आधी एसटी कर्मचारी आंदोलन, शरद पवार यांच्या घरावर हल्ला, अनिल देशमुख, नवाब मलिकांमुळे तापलेले होते. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उचलत मशिदींवरील भोंग्याना आपले लक्ष केले आणि हनुमान चालिसा पुढे आणली. यामुळे राज्यातील राजकीय वारे हे हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यावर वाहू लागले होते. दरम्यान अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत वादग्रस्त अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली. आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. केतकीवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांसह विरोधकांनीही कडाडून टीका केली. त्यानंतर त्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली. तिला कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र राज्यात या विषयावरून राजकारण सुरू असतानाच अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) ती अत्यंत वादग्रस्त पोस्ट पाठवणारी व्यक्ती कोण? याबाबत जनसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. तर याबाबत आता पोलिसही तपास करत आहेत. पोलिसांकडून ती व्यक्ती कोण याचा शोध ही सुरू करण्यात आला आहे.

मोबाईल फॅारेन्सिक विभागाकडे

वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पोलिसांनी केतकीला अटक केल्यानंतर तिच्या घरी जाऊन पोलिसांनी झडती घेतली. तसेच तिचा लॅपटॉपही ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच तिचा फोन ही ताब्यात घेण्यात आल्याचेही कळत आहे. ज्याचा तपास सायबर सेल करत आहे. तर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. ज्यात तिने आपल्या मोबाईलमधील मेसेज डिलीट केली आहेत. तर ते मेसेज पुन्हा मिळविण्यासाठी तिचा मोबाईल फॅारेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तर याच दरम्यान केतकीने जूनी पोस्ट जी 2020 मधील आहे, ती आता का केली. याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तर महत्वाची बाब म्हणजे केतकी ही सोशल मीडिया असतानाच ती मात्र व्हॉटसअॅप वापरत नव्हती. त्यामुळे पोलिसांकडून ती संपर्कासाठी नक्की कोणत्या मार्गाचा वापर करत होती याचा तपास करत आहे. तर पोलिसांना असा संशय आहे की तो मेसेज केतकीने बनवलाच नव्हता तर तिला तो कोणी दुसऱ्यानेच पाठवला होता. त्यामुळे पोलिस सध्या ती व्यक्ती कोण याचा तपास करत आहेत.

केतकीच्या अडचणी वाढल्या

याचवेळी तपास करणाऱ्या पोलिसांनी केतकीवर आनखीन एक कलम वाढवले आहे. त्यात आयटी कलमाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्याचेही बोलले जात आहे. यादरम्यान तिने आपल्याला जामीन मिळावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज ही दाखल केला होता. मात्र त्यावर सुनावणी झाली नाही.

ठाणे पोलीसासह गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पवार यांच्यावर अत्यंत वादग्रस्त अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी तिच्यावर ठाणे पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिच्यावर गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिचा ताबा मिळावा म्हणून गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने तिचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.

कुणी सांगितलं म्हणून पोस्ट केली?

केतकी चितळे हीचा बोलविता धनी कोण आहे, या अनुशंगानंही पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे. तिनं कुणाच्या सांगण्यावरुन फेसबुक पोस्ट केली होती का? त्यासाठी तिला कुणी सांगितलं होतं का? याबाबतची पोलिसांकडून तपास केला जातोय. केतकी चितळे हीनं वकील नितीन भावे यांच्या नावे लिहिलेल्या वादग्रस्त कवितेच्या ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या होत्या. या पोस्टनंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं.

केतकी चितळेची पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट काय?

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.