AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत; भाजपचा सवाल

वाजे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार | BJP Uddhav Thackeray

एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत; भाजपचा सवाल
नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आल्याचे त्यांनी सांगितले.
| Updated on: Mar 17, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे (Sachin Vaze) यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी सुद्धा बैठकाचा धडाका कधी लावणार, असा सवाल भाजप नेते संजय कुटे (Sanjay Kute) यांनी उपस्थित केला. एरवी दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत. ही एक आश्चर्यजनक बाब आहे. वाजे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचे कुटे यांनी म्हटले. (BJP leader Sanjay Kute take a dig at CM Uddhav Thackeray)

ते बुधवारी मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. महाविकासआघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आल्याचे त्यांनी सांगितले.

‘सरकार सगळ्या प्रश्नांपासून पळ काढतेय’

सक्तीच्या वीजबिल वसुलीचे सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. विधानसभेत वीज बील वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे हे यातूनच स्पष्ट होते. कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे अशी टीकाही संजय कुटे यांनी केली.

‘संजय राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता?’

काही दिवसांपूर्वीच संजय कुटे यांनी संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारला लक्ष्य केले होते. शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी विचारला होता.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारला आणखी एक धक्का? मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही NIA कडे जाण्याची शक्यता

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

(BJP leader Sanjay Kute take a dig at CM Uddhav Thackeray)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.